चिखली-
तालुक्यातील अनेक गावातील थकीत वीज बिल न भरल्याने शेतकऱयांचे कृषिपंपाचे वीज कनेक्शन कट करून विद्युत पुरवठा खंडित केल्याने तालुक्यातील शेतकर्यासह
विनायक सरनाईक आक्रमक भुमिका घे दि26/11/2021रोजी चिखली महावितरण कार्यालयात पुर्व सुचना न देता तोडलेली विज कनेक्शन पुर्ववत करण्यात यावे,सक्तीची विज बिल वसुली थांबवण्यात यावी, या मागणी साठी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले होते.दरम्याण बुलढाणा कार्यकारी अभियंता जायभाये यांनी विद्युत पुरवठा पुर्ववत करण्याचे अश्वासन दिल्याने व विज समस्या सुटली असल्याने आंदोलनाची सांगता रात्री उशीरा करण्यात आली आहे.
चिखली तालुक्यातील 10 ते 12 गावातील शेती पंपाचे विज कनेक्शन तोडल्याने शेतकर्याच्या शेतातील पिके सुकायला लागली आहेत.वीज नसल्याने विहिरीतील पाणी पिकांना देता येत नसल्याने शेतकरीवर्ग चिंतेत आहे.मागील महिण्यात झालेली अतिवृष्टिमुळे शेतकर्याचे सोयाबीन पिक हातचे गेले परंतु अद्यापर्यत शासनाकडुन खरडुन गेलेल्या व नुकसान झालेल्या पिकाची नुकसान भरपाई मिळाली नाही विशेष म्हणजे परवाला स्वाभिमानी चे नेते रविकांत तुपकर यांच्या उपस्थीतीत शेतकरी हिताच्या मागण्यांच्या अनुषंघाने जि बैठक उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घेतली होती.त्यामधे विजे संदर्भातील विषय प्रामुख्याने घेण्यात आला होता दरम्याण उपमुख्यमंत्री व ऊर्जा मंत्री यांनी सक्तीने वसुली करु नये,व शेतकर्याना त्रास होणार नाही याबाबत संबंधीत विभागास सुचना देखील दिल्या होत्या याबाबत राज्य शासनाकडुन महावितरणला अनुदान म्हणुन रक्कम देऊ केली आहे.तसा शासन निर्णय देखील काढण्यात आला आहे.
असे असतांना देखील गेल्या दोन दिवसापासुन वीज महावितरण कंपनीने चिखली तालुक्यातील वीज कनेक्शन कसलीही पुर्वसुचना न देता थकीत विज बिल वसुलीचे कारण समोर करुण सर्रास विज तोडण्याचा सपाटा लावला आहे.यातच सोमठाणा,दिवठाणा,सवणा,यासह परीसरातील शेतकर्याचे कनेक्शन तोडण्याचा प्रकार कसलेही आदेश नसतांना महावितरण कार्यालयाकडुन होतांना दिसत असल्याने हि एक प्रकारे सक्तीचीच वसुली असल्याचे म्हणत पुर्व सुचना न देता तोडलेले विद्युत कनेक्शन जोडण्याची मागणी घेऊन चिखली महावितरण कार्यालय गाठत शेतकर्यासह स्वाभिमानी चे विनायक सरनाईक यांच्या नेतृत्वात शेतकर्यानी बेमुदत ठिय्या आंदोलनास सुरूवात केली होती.तर जोपर्यंत वीज जोडणी केली जात नाही.तोपर्यंत कार्यालय सोडणार नाही अशी भूमिका शेतकर्यासह सरनाईक यांनी घेतली होती.दरम्याण बुलढाणा महावितरण कार्यालयाचे कार्यकारी अभियंता जायभाये व चिखली उप अभियंता भुसारी यांनी शेतकरी आंदोलनाचे गांभीर्य लक्षात घेता आंदोलन स्थळी भेट देत शेतकर्याना विज बिल भरणा केला तर कंपणी टिकेल त्यामुळे थोडे बहोत का होईना बिल भरा महावितरणला सहकार्य करा अशी विनंती कार्यकारी अभियंता यांनी केल्याने शेतकर्यानी त्यांच्या भावनेचा विचार करीत त्यास दुजोरा दिल्याने विज जोडणी संदर्भात अश्वासन दिले होते.दरम्याण रात्री उशीरा विद्युत पुरवठा पुर्ववत झाला असल्याने महावितरण कार्यालयातील आंदोलनाची सांगता करण्यात आली आहे.
विनायक सरनाईक,बळीराम हाडे,औचितराव वाघमारे,सुंदर्शन वाघमारे,विजय मोरे,गणेश इंगळे,शालिकराम हाडे,गजानन खडके,अमोल झगरे,संदिप हाडे,राहुल वाघमारे,इश्वर झगरे,यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
अन्यथा कायदेभंग आंदोलन छेडु.
नुकत्याच झालेल्या अतिवृष्टि मुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.हातचे सोयाबीन पिक गेले आता हरभरा,गहु पेरणी केली परंतु महावितरण चे कर्मचारी कसलीही सुचना न देता सक्तीने कनेक्शन कापत असल्याने पुर्व सुचना न देता कनेक्शन कापले जात असतील तर स्वाभिमानी तालुक्यात सविनय कायदेभंग आंदोलन हाती घेईल व तोडलेले कनेक्शन जोडेल असा इशारा स्वाभिमानी चे सरनाईक यांनी दिला आहे.
प्रतिनिधी - गोपाल उगले
Published on: 27 November 2021, 08:42 IST