News

कोरेगांव: महाराष्ट्र शासन कृषि विभाग कोरेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. रोकडेश्वर कृषि विज्ञान मंडळामार्फत शेतकऱ्यांना सोयाबिनचे ग्रामबिजोत्पादन कार्यक्रमासाठी के. डी. एस ७२६ या वाणाचे मुलभूत (ब्रिडर) बियाणे ४.२० क्विटल व फौंडेशनचे ३.०० क्विटल महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी यांच्याशी सामंजस्य करारान्वये उपलब्ध झाले आहे. श्री. रोकडेश्वर कृषि विज्ञान मंडळ, रहिमतपुर यांच्या माध्यमातुन सोयाबिन बियाणे, बिजप्रक्रिया करिता ५० टक्के ईमाडाक्लिप्रिड, फुले रायझोबियम व फुले स्फुरद जिवाणू संवर्धक याचे शेतकऱ्यांना वाटप केले.

Updated on 16 June, 2020 8:42 AM IST


कोरेगांव:
महाराष्ट्र शासन कृषि विभाग कोरेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. रोकडेश्वर कृषि विज्ञान मंडळामार्फत शेतकऱ्यांना सोयाबिनचे ग्रामबिजोत्पादन कार्यक्रमासाठी के. डी. एस ७२६ या वाणाचे मुलभूत (ब्रिडर) बियाणे ४.२० क्विटल व फौंडेशनचे ३.०० क्विटल महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी यांच्याशी सामंजस्य करारान्वये उपलब्ध झाले आहे. श्री. रोकडेश्वर कृषि विज्ञान मंडळ, रहिमतपुर यांच्या माध्यमातुन सोयाबिन बियाणे, बिजप्रक्रिया करिता ५० टक्के ईमाडाक्लिप्रिड, फुले रायझोबियम व फुले स्फुरद जिवाणू संवर्धक याचे शेतकऱ्यांना वाटप केले.

बिजोत्पादन कार्यक्रमामध्ये नोंदणीकृत शेतकरी गटांना सामंजस्य करारान्वये कृषि विद्यापीठाकडुन मुलभूत (ब्रिडर) व पायाभूत बियाणे उपलब्ध करुन दिले जाते. सदर बिजोत्पादन कार्यक्रमामधुन उत्पादित बियाणे प्रमाणित करुन शेतकऱ्यांना विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात येते. यातुन गावातील शेतकऱ्यांची बियाण्याची गरज शेतकरी गटामार्फत पुर्ण करण्याचा उद्देश आहे. शेतकरी गटामार्फत बिजोत्पादन केल्याने शेतकऱ्यांना दर्जेदार, खात्रीशीर व अधिक उत्पादनक्षम सुधारीत जातीचे बियाणे गावातच किफायतशीर दरात उपलब्ध होते. तालुक्यातील इतर शेतकरी गटांमार्फत विविध पिकांसाठी ग्रामबिजोत्पादन कार्यक्रमांद्वारे बियाणे उत्पादित करणाऱ्या गटांना कृषि विभाग सर्वोतोपरी मदत करेल असे प्रतिपादन तालुका कृषि अधिकारी, कोरेगाव यांनी केले.

मंडल कृषि अधिकारी श्री. ज्ञानदेव जाधव यांनी मार्गदर्शन करताना सागितले की, कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर रहिमतपुर मंडलामार्फत या वर्षी शेतकरी बचत गटांना बांधावर खते व बियाणे वाटप, हुमणी किड नियंत्रण मोहिम, सोयाबिन उगवणक्षमता चाचणी प्रात्यक्षीक व बिज प्रक्रिया बांधावर तुर लागवड, शेतकऱ्यांची शेतीशळा, पिक प्रात्यक्षिक पेरणी यंत्राच्या/रुंद सरी वरंबा (बि.बि.एफ), सहाय्याने पेरणी करणे अश्या स्वरुपात कृषि विभागाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी चालु आहे.

सदर बियाणे वाटप कार्यक्रमास तालुका कृषि अधिकारी श्री. बापुसाहेब शेळके, नगराध्यक्ष श्री. आनंदराव कोरे, मंडल कृषि अधिकारी ज्ञानदेव जाधव, श्री. रोकडेश्वर कृषि विज्ञान मंडळ, रहिमतपुर अध्यक्ष श्री. अनंत माने, प्रगतशिल शेतकरी अरुन माने, विद्याधर बाजारे, वासुदेव माने, संजय माने, मानिकराव माने, भिमराव सावंत, विवेक पवार, संदेश कणसे, हसन मुलाणी, कृषि पर्यवेक्षक, दिलीप जाधव आत्मा (बिटिएम), राजेंद्र जंगम, कृषि सहाय्य्क व गटातील सर्व सदस्य उपस्थित होते.

कृषि विभाग कोरेगाव दृष्टिक्षेपात:

  • बांधावर खत वाटप : ९८९ मे. टन खते, ११४ शेतकरी गट व १,९८४ शेतकरी.
  • सोयाबीन व घेवडा बियाणे उगवण क्षमता प्रात्यक्षिक : ५१७ प्रात्यक्षिक.
  • हुमणी कीड नियंत्रण मोहिम : ३४७ प्रकाश सापळे, ७२ एरंड आंबवण सापळे.
  • मग्रारोहयो २०-२१ नियोजन : फळबाग लागवड, गांडूळ व नॅडेप युनिट १,००० कामे ५४,७४६ मनुष्य दिन निर्मिती.
  • शेतीशाळा : ४४ (सोयाबीन-३० घेवडा-१०, मका-०२ व ऊस-०२)
  • पिक प्रात्यक्षिक : ८० (सोयाबीन-५७, घेवडा-२३)
  • बांधावर तुर लागवड : ७५० हेक्टर (३००किलो)
  • ग्राम बीजोत्पादन कार्यक्रम : ४० हेक्टर (४ गट)
  • फळे व भाजीपाला वाहतूक : परवाने वाटप २४७, जिल्हा व जिल्ह्याबाहेर फळे व भाजीपाला विक्री ३,६५४ मे. टन.

कृषि विभागाच्या समन्वयाने कृषि विज्ञान मंडळामार्फत राबविण्यात येणारा ग्रामबिजोत्पादन कार्यक्रम सर्व शेतकरी बांधवांचे हिताचा असून तालुक्यातील ईतर बचतगट व कृषि विज्ञान मंडळानी याचे अनुकरन करावे. तसेच मग्रारोहयो अंतर्गत फळबाग लागवड, गांडूळ व नाडेप या वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ तालुक्यातील शेतकऱ्यांनी घेणेबाबत आवाहन केले.

- श्री. बापुसाहेब शेळके (तालुका कृषि अधिकारी, कोरेगाव)

English Summary: Village seed production program is the need of the hour
Published on: 16 June 2020, 08:20 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)