News

१४ ऑगस्ट पासुन पं.स.समोर उपोषणाचा इशारा.

Updated on 10 August, 2022 8:26 PM IST

१४ ऑगस्ट पासुन पं.स.समोर उपोषणाचा इशारा.संग्रामपूर तालुक्यातील वरवट खंडेराव ग्रामपंचायत येथे कार्यरत असलेले सचिव अविनाश येणकर यांनी गेल्या अनेक वर्षांपासून गावातील काही लोकांना हाताशी धरून शासनाची दिशाभूल करुन योजनेच्या नावाखाली लाखो रुपये कमावत असल्याचे उघडकीस आले आहे. गावा नजीक ओल्या पार्ट्या

करुन लोकांना खोटी व चुकिची माहीती देऊन प्रतीस्पर्दी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न ग्रामसेवक करत आहेत. अशातच शासकीय जागेचा एक बनावट गाव नमुना ८ अ तयार करुन येणकर यांनी गावात आप आपसात दोघांमध्ये वाद निर्माण केला आहे. तो वाद न्यायालयापर्यंत पोहोचण्यासाठी येणकर यांची मेहणत चांगलीच फळाला लागली. कदाचित हे नियतिला मान्य नसेल. त्यामुळे गावातील

इलेक्ट्रिक पोलवर बसवलेले सौर ऊर्जेचे ३ लाईट गायब असल्याचे गावकऱ्यांच्या निदर्शनास आले असल्याने संतोष गाळकर यांनी माहिती अधिकारातुन ग्रामपंचायतला माहिती मागितली. पंरतु ग्रामसेवक अविनाश येणकर यांनी चक्क तिनही सौर ऊर्जेचे लाईट अस्तित्वातच नसतांना पोलवरच असल्याचे लेखी स्वरूपात चुकिची माहिती दिली. येणकर यांच्या अशा अनेक तक्रारी आहेत.Yenkar has many such complaints.या सर्व तक्रारी बाबत ग्रामपंचातने केलेल्या दोन वर्षांतील कामाची व सर्व

खातेनिहाय चौकशी करून दोषींवर कारवाई करा. अशी मागणी ८ ऑगस्ट रोजी संतोष गाळकर यांनी निवेदनातून केली आहे. कारवाई न झाल्यास १४ ऑगस्ट पासून पं.स.संग्रामपुर कार्यालया समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा मुख्य कार्यपालन अधिकारी जि.प. बुलढाणा यांचेकडे केली असल्याने गट विकास अधिकारी पाटील,व ग्रामसेवक येणकर यांच्या सह काही सचिवांची जिल्हाभर गाजत असलेली ओली पार्टी या उपोषणाने पुन्हा चर्चेत येणार आहे हे विशेष.

English Summary: Village Secretary's dalla on pole mounted solar light.
Published on: 10 August 2022, 08:26 IST