News

मराठवाडा आणि विदर्भातील निवडक 10 जिल्ह्यातील शेतकरी गटांना मासळी विक्रीसाठी फिरते वाहन उपलब्ध करुन देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे मराठवाड्यातील 17 आणि विदर्भातील 27 अशा एकूण 44 शेतकरी गटांना लाभ होणार आहे.

Updated on 26 October, 2018 7:58 AM IST

मराठवाडा आणि विदर्भातील निवडक 
10 जिल्ह्यातील शेतकरी गटांना मासळी विक्रीसाठी फिरते वाहन उपलब्ध करुन देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे मराठवाड्यातील 17 आणि विदर्भातील 27 अशा एकूण 44 शेतकरी गटांना लाभ होणार आहे. 

या योजनेंतर्गत शासनाकडून 90 टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यात येणार असून 10 टक्के लाभार्थ्यांचा हिस्सा असणार आहे. एका गटासाठी जिल्हा नियोजन समितीकडून 6लाख उपलब्ध करण्यात आले आहेत. या माध्यमातून पाच शेतकऱ्यांचा समावेश असलेल्या गटाला एक वाहन देण्यात येणार आहे. तसेच मासेमारांकडून शेतकरी गटांना मासे उपलब्ध करुन देण्यासाठी सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त हे समन्वय साधणार आहेत.

शेतकरी गटाच्या सदस्यांना मासे हाताळणेत्यांचे शीतपेटीत जतन करणे आणि त्यांच्यावर प्रक्रिया करणे याबाबतचे प्रशिक्षण जिल्हास्तरावर देण्यात येणार आहे. या माध्यमातून विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी गटांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

English Summary: Vidarbha and Marathwada farmers group to get Mobile van for fish sale
Published on: 26 October 2018, 07:15 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)