News

चिखली-नदिकाठचे सोयाबीन पाण्यात तर उभ्या पिकालाही सततधार पावसामुळे फुटले कोंब.

Updated on 29 September, 2021 11:25 AM IST

जिल्ह्यामध्ये काल परवा पासुन सततधार व मुसळधार पाऊस सुरू आहे.यामुळे धरणं भरुण वाहत आहेत तर नद्या जलमय झाल्याने २८सप्टेंबर रोजी पैनगंगा नदिला मोठा पुर आल्याने नदिकाठच्या गावांना या पुराच्या पाण्याचा फटका बसल्याने नदिकाठच्या शेतामधील सोयाबीन पिक पाण्यात गेले असुन मोठे नुकसान शेतकर्याचे झाले आहे.या नुकसानग्रस्त भागाची पाहणी स्वाभिमानीचे विनायक सरनाईक यांनी केली असुन कुठलेही नियम,अटि,निकष न लावता तालुक्यातील नुकसाग्रस्त शेतकर्याना नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकर्यासह सरनाईक यांनी केली आहे. 

तालुक्यमध्ये दोन दिवसापासुन सततधार व मुसळधार पाऊस पडत आहे.या पावसाने अनेकांचे घरे,विहरी खचल्या आहेत.उभ्या व सोंगुन पडलेल्या सोयबीन व इतर पिकाला कोंब फुटले आहे.या पावसाचा फटका तालुक्यातील शेतकर्याना बसला असुन मोठे नुकसान या सोयाबीन उत्पादक शेतकर्याचे झाले आहे.दरम्याण याच अतिवृष्टिमुळे यळगाव धरणाचे स्वयंचलीत गेट उघडल्याने दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा पैनगंगा नदिला मोठा पुर आल्याने यळगाव,सवणा,किन्होळा,वाडी ब्रम्हपुरी,सोमठाणा,दिवठाणा,उत्रादा,पेठ,बोरगाव,पांढरदेव,देवदरी त्याचप्रमाणे इतर ठिकानच्या नदि काठच्या जमीनी खरडुन जाऊन पिकाचे नुकसान देखील झाले आहे.

शेतकर्याचे उभे पिक पाण्याखाली गेले असल्याने सोयाबीन दाने फुगले आहेत तर काहिच्या उडदाला सुद्धा बुरशी लागली असल्याने शेतकर्याच्या हाता तोंडाशी आलेला घास सुद्धा हिरावला गेला आहे.दरम्याण पाऊस सुरु असतांनाच या नुकसानग्रस्त भागाची पाहणी डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे सदस्य तथा स्वाभिमानीचे विनायक सरनाईक यांनी केली असुन पेठ,उत्रदा,यासह आदि गावातील शेतकर्राना धिर देत दिलासा देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.शेतकर्याचे भरुण न निघणारे नुकसान या पावसामुळे झाले असुन जिल्ह्यात ओला दुष्काळ पडला असल्याची परीस्थीती निर्मान झाल्याने या चिखली तालुक्यातील शेतकर्राना नियम,निकष न लावता सरसगट नुकसान भरपाई देण्यात यावी,

अशी मागणी देखील नुकसानग्रस्त शेतकर्यासह सरनाईक यांनी केली आहे.यावेळी स्वाभिमानी चे संतोष शेळके,रासपचे मनोज जाधव,विष्णु डुकरे,संतोष इंगळे,विठ्ठल शेळके,शिवशंकर शेळके,संजय शेळके यांच्यासह शेतकरी उपस्थीत होते.

 

प्रतिनिधी - गोपाल उगले

English Summary: Victims should get help without imposing rules, criteria - Vinayak Saranaik
Published on: 29 September 2021, 11:25 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)