प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या संकल्पना मधून रानभाज्या याचा महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे की यावर्षी सुद्धा अकोला मध्ये हा महोत्सव संचालक कार्यालयाच्या आवारात रानभाज्या (Vegetables )महोत्सव असा सोमवारी आकारण्यात आलेला आहोत. अकोला मधील जास्तीत जास्त नागरिकांनी या महोत्सवास चांगलाच प्रतिसाद दिला जे की अगदी चांगल्या प्रकारे खरेदी करत या रानभाज्या महोत्सवात ४५ हजार रुपयांच्या रानभाज्यांची उलाढाल झाली आहे.रानभाज्या या महोत्सव कार्यक्रमाचे उदघाटन तेथील जिल्हा अधिकारी निमा अरोरा यांनी केले तसेच अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यिक डॉ. विठ्ठल वाघ, प्रभारी उपसंचालक संध्या करवा.
आहाराचे पोषण वाढविण्यासाठी:
प्रकल्प संचालक डॉ के.बी.खोत, ‘आत्मा’चे प्रकल्प उपसंचालक दिनकर प्रधान, तालुका कृषी अधिकारी दिनकर प्रधान, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अलोक तेराणीया आणि तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विजय शेगोकार यांनी या महोत्सवाच्या कार्यक्रमास आपली प्रमुख उपस्थिती लावलेली होती .या कार्यक्रमात उपस्थित जिल्हा अधिकारी निमा अरोरा यांनी सांगितले की आपल्या आहाराचे पोषण वाढविण्यासाठी रानभाज्या उपयुक्त ठरतात एवढेच न्हवे तर आपल्या शरीरातील प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी या भाज्यांची मदत होते.
तसेच त्यांनी हेही सांगितले की शासनाच्या आत्मा महिला बालविकास, महिला आर्थिक विकास महामंडळ यासारख्या संस्थांनी बचत गटअंतर्गत शेतातील माल विकण्यास प्रयत्न करण्यास काय हरकत नाही.हा रानभाज्या महोत्सव अगदी चांगल्या प्रकारे यशस्वी व्हावा म्हणून वरुण दळवी, अर्चना पेठे, संदीप गवई,राहुल अडाणी, दीपक मोगरे, व्ही.एम शेगोकार, मंगेश झामरे, योगेश देशमुख,सचिन गायगोळ यांनी खूप कष्ट घेतले तसेच कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम कृषी पर्यवेक्षक अनंत देशमुख यांनी केला.
महोत्सवात रानभाज्याचे २० पेक्षा जास्त प्रकार उपलब्ध:
रानभाज्या या महोत्सवात करटोली, चिवय, आघाडा, पाथरी, अंबाडी, केना, करवंद, चमकुराचे पाने, फांदीची भाजी, तरोटा, आंबटचुका, वाघाटे, गवती चहा, गोबरु कंद, तांदळजा, सुरण कंद, कुर्डु, गुळवेल, शेवगा यासह २० पेक्षा अधिक प्रकारच्या रानभाज्या उपलब्ध होत्या. आत्माच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भाज्यांची विक्री झाली जे की यावेळी महोत्सवात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात भाज्यांची खरेदी केली. रानभाज्या महोत्सव मध्ये १२ स्टॉल उभारण्यात आले होते त्यामध्ये अकोला मधील नागरिकांनी ४५ हजार रुपये चा भाजीपाला खरेदी केला आहे असे सूत्रांच्या माहितीनुसार समजले.
Published on: 10 August 2021, 07:28 IST