News

Vegetables became expensive: सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे पीकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. ज्याचा फटका भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना देखील बसला आहे. या सर्व परिस्थितीत भाजी बाजारात भाज्यांची आवक घटली आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे दर वाढले आहेत.

Updated on 31 October, 2022 2:30 PM IST

Vegetables became expensive: सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे पीकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. ज्याचा फटका भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना देखील बसला आहे. या सर्व परिस्थितीत भाजी बाजारात भाज्यांची आवक घटली आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे दर वाढले आहेत.

भाजीपाला महागला

बाजारात शेवगा 200 रुपये किलो मिळत आहे. तसेच शहरातील किरकोळ भाजी बाजारात वांगी, टोमॅटो, भेंडी, फ्लॉवरसह सर्वच फळभाज्यांची सरासरी 60 रुपये किलो दर पाहायला मिळत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसत आहे.

भाजीपाला दर

अ.क्र. भाजीपाला दर (प्रतिकिलो)
1 शेवगा 200
2 गवार 80
3 टोमॅटो 60
4 भेंडी 60
5 वांगी 60
6 फ्लॉवर 60
7 कांदा 50
8 बटाटे 30

मोठी बातमी: शरद पवारांची तब्येत बिघडली; ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

परतीच्या पावसाचा फटका पालेभाज्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. त्याचबरोबर सोयाबीन, कापूस, फळबागांसहित पालेभाज्या पिकांनाही फटका बसला आहे. या नुकसानीमुळे बाजार समित्यामध्ये होणारी पालेभाज्यांची आवक सरासरीने कमी झाली आहे. त्यामुळे सध्या भाज्यांच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे.

मोठी बातमी: ...तर एक नोव्हेंबरपासून गॅस सिलिंडरची डिलिव्हरी मिळणार नाही; जाणून घ्या...

दिवाळीमुळे भाज्यांची मागणी वाढली आहे. पण पुरवठा होत नसल्यामुळे भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. एका महिन्यानंतर पालेभाज्यांची आवक वाढणार असून त्यानंतर भाव कमी होतील अशी अपेक्षा बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

मानलं रे! जळगावमध्ये शेतकऱ्यांने केळीच्या शेतीतून कमावले तब्बल एक कोटी रुपये

English Summary: Vegetables became expensive; Shevaga 200 rupees per kg
Published on: 31 October 2022, 02:30 IST