मालाची आवक वाढल्याने अकोले तालुक्यातील राजूरच्या बाजारात भाजीपाल्याचे दर गडगडले आहेत. साधारण दहा-पंधरा दिवसांपूर्वी असणाऱ्या दरापेक्षा सध्याचे दर ५० टक्क्यांहून कमी झाल्याने शेतकरी मात्र आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
अवकाळी आणि परतीच्या पावसामुळे आधीच शेतकरी चिंतेत असताना आता भाज्यांचे दर पडल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. तसेच जी पिके हाताला आली आहेत, त्यांना पाणी देण्यासाठी देखील महावितरण लाईट कट करत आहे.
यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसत आहे. गेल्या वर्षी तुफान पाऊस झाल्याने बागायती क्षेत्र वाढले आहे. त्यामुळे बहुतांशी शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून भाजीपाल्याची लागवड केली आहे.
समृद्धी महामार्गाची खरी कहाणी! आलिशान गाड्या, कोट्यावधीचे बंगले आणि बक्कळ पैसा, शेतकरी मालामाल
हा भाजीपाला एकाचवेळी बाजारात येऊ लागल्याने दर कोसळला आहे. टोमॅटोचा बाजारातील दर ५ रुपये किलो तर वांग्याचा दर १० रुपये किलो झाला आहे. भेंडी, हिरवा वाटाणा, मिरची, गाजर, कोबी, फ्लॉवर या सर्वच भाज्यांचे दर निम्म्याहून कमी झाले आहेत.
यामुळे आता जगायचे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. सध्या शेतकरी हे दुग्ध व्यवसायावर अवलंबून आहेत. यामध्ये सध्या चांगले दर शेतकऱ्यांना मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या;
वाहने 150 च्या स्पीडने जात आहेत, टोलमधून करोडोची कमाई, पण समृद्धी महामार्गावर काम केलेल्या तीनशे मजुरांना 5 महिन्यापासून वेतन नाही
आता शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार, सौर ऊर्जा प्रकल्पाना दिली चालना...
वीज कनेक्शन खंडीत केल्याने शेतकऱ्याने लाईव्ह व्हिडीओ करत घेतलं विष, घटनेने राज्यात खळबळ..
Published on: 04 January 2023, 12:34 IST