सध्या राज्यात महागाईचा चांगलाच भडका उडाला असून सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या बऱ्याच गोष्टींचे भाव वाढल्याने महिलांचे आर्थिक गणित विस्कळीत झाले आहे. त्यात आता महागाईचा अजूनच एक झटका बसला आहे. भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. जवळजवळ दोन ते तीन पटीने ही दरवाढ झाली आहे.
पावसाळ्याच्या तोंडावर,औरंगाबादच्या सर्वच भाजी मंडित हेच चित्र आहे. बीन्स,शेवगा, दोडके आणि कारलेच्या दराने अक्षरशः शंभरी पार केली आहे. भाज्यांची आवक कमी झाली की त्यांच्या किमतीत वाढ होते हे सूत्र कायम आहे. सध्या भाजी मार्केटमध्ये भाज्यांची आवक कमी झाल्याने भाजीपाला महाग झाला आहे. औरंगाबादच्या गुलमंडी, शहागंज, उस्मानपुरा, मुकंदवाडी आणि जाधवमंडीत भाजीपाल्याचे दर वाढले आहेत.
रोजच्या आहारात लागणाऱ्या भाज्या जसे की कारले, दोडके तसेच शेवग्याची भाजी शंभर रुपये किलो दराने मिळत आहे. तर टोमॉटो 80 रुपये किलोने मिळत आहे. फक्त औरंगाबाद शहरात दररोज सुमारे 30 ते 40 टन टोमॉटोची विक्री होते. मात्र टोमॉटोचीही आवक कमी झाल्याने त्याचे दर वाढले आहेत.
जाणून घ्या आजचे दर
औरंगाबाद शहरात भाजी मार्केटमध्ये बीन्स 150 रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. तर शेवगा 110 रुपये, दोडके 100 रुपये किलो, कारले 100 रुपये तसेच फुलकोबी, सिमला सिमला आणि गवार भाज्या 80 रुपये प्रतिकिलो दराने विकले जात आहे. शिवाय टोमॉटोसुद्धा 80 रुपये किलोप्रमाणेच विकला जात आहे.
काय सांगता! अच्छे दिन यावे म्हणून पठ्ठ्याने चक्क मुंगूसच पाळलं; वनविभागाने दाखवला हिसका
दर वाढीचे कारण
यंदा अति तापमानामुळे भाज्यांवर बराच परिणाम झाला आहे. उन्हाचा अति मारा भाज्यांचा दर्जा कमी करते. यातूनच भाज्यांचे उत्पन्न कमी झाले व भाजी
मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक कमी झाली. परिणामी भाज्यांच्या दरात वाढ झाली. मात्र पावसाळा सुरु झाल्यानंतर दरात घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
Mansoon 2022: पंजाबरावांचा जून महिन्याचा मान्सून अंदाज जाहीर, शेतकऱ्यांना दिला महत्वाचा सल्ला
एक असाही अवलिया; पाण्यासाठी खोदले 70 हून अधिक चर, देशाने घेतली नोंद
Published on: 12 June 2022, 03:19 IST