1. बातम्या

अवकाळी पाऊस:राज्यात अवकाळी पावसाने भाजीपाला पिकांना फटका, भाव शंभरी पार

हिवाळा सुरू असताना ऐन हिवाळ्यात डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला राज्याच्या विविध भागात पावसाने झाली. हा पडणारा अवकाळी पाऊस मुंबईसह कोकण विभागात, पश्चिम महाराष्ट्र तसेच नाशिक उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी जोरदार बरसत आहे. आधीच संकटाच्या गर्तेत असणारा शेतकरी याच्यामुळे आणखीनच भरडला जाण्याची शक्यता वाढली आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
vegetable

vegetable

वाळा सुरू असताना ऐन हिवाळ्यात डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला राज्याच्या विविध भागात पावसाने झाली. हा पडणारा अवकाळी पाऊस मुंबईसह कोकण विभागात, पश्चिम महाराष्ट्र तसेच नाशिक उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी जोरदार बरसत आहे. आधीच संकटाच्या गर्तेत असणारा शेतकरी याच्यामुळे आणखीनच भरडला जाण्याची शक्यता वाढली आहे. 

 या येणाऱ्या पावसामुळे पिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याचा अंदाज कृषी आयुक्तालय व कृषी हवामान शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.

 खरे पाहायला गेले तर यावर्षी तिन्ही ऋतू एकत्र अनुभवयास मिळत आहे. मागे काही दिवस ऑक्टोबर हिटमुळे अक्षरशा उकाडा होता तर कधी अचानक थंडी वाढल्यामुळे हिवाळ्याची अनुभूती येत होती. आता जर पाहिले तर राज्यातील नागरिकांना पावसाळ्याच्या अनुभूती येऊन सलग तीन ऋतू अनुभवायला मिळत आहेत. आता सुरु झालेल्या या पावसाने भाजीपाला पिकांना फटका बसून बहुतांशी भाज्यांचे दर शंभरी पार झाले आहेत.

 बुधवारी राज्याच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावली.कोकण विभागातील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला तसेच मध्य महाराष्ट्रातही पावसाने बऱ्यापैकी दिवसभर रिपरिप सुरू होती.

 या अवकाळी पावसाची कारणे

 अरबी समुद्रामध्ये 30 नोव्हेंबरला कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन त्याची तीव्रता 1 डिसेंबरला वाढल्याने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र मध्ये पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळाला. 

हे कमी दाबाचे क्षेत्र सध्या अरबी समुद्र पासून तर कच्छ  पर्यंत तयार झाले आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम हा महाराष्ट्राच्या पश्चिम भागावर होत आहे. त्यासोबतच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्याची तीव्रता वाढत आहे. 2 डिसेंबरला त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता असून ते आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टी जवळून जाणार आहे त्याचा परिणाम महाराष्ट्रावर फारसा होणार नाही.

English Summary: vegetable price in local market is high due to destroy vegetable crop in rain Published on: 02 December 2021, 06:51 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters