जुलै महिन्यात जो काही पाऊस झाला, या पावसाने इतर पिकांसोबत भाजीपाला आणि फळपिकांच्या देखील मोठ्या प्रमाणात नुकसान केले. राज्यात जो काही पाऊस पडला त्यामुळे भाजीपाला पिके जागेवर खराब झाल्यामुळे भाजीपाला आणि फळपिकांच्या आवकमध्ये घसरण झालेली पाहायला मिळत आहे.
या सगळ्या परिस्थितीमुळे अनेक फळभाज्यानी शंभरचा टप्पा ओलांडला असून पालेभाज्या देखील पंचवीस ते तीस रुपये गड्डी याप्रमाणे विकली जात आहे. राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये भाजीपाला आवक अगदी अत्यल्प प्रमाणात होत असून त्यामुळे दर वधारले आहेत.
तसेच जो काही बाजारपेठेत भाजीपाला येत आहे त्याचा दर्जा देखील पावसामुळे घसरला असून 30 ते 40 टक्के भाज्या खराब झालेले आहेत. जर आपण यामध्ये भेंडी, शेवगा, गवार आणि मटार सारख्या फळभाज्यांचा बाजारभावाचा विचार केला तर किरकोळ बाजारामध्ये भाव शंभरी पार झाले आहेत.
त्यासोबतच हिरवी मिरची, सिमला मिरची, वांगी, दोडके या सारख्या भाजीपाल्याचा दर प्रतिकिलो 80 रूपयेपेक्षा अधिक आहे.
पालक, कोथिंबीर, मेथी आणि कांदा पात तसेच अंबाडी आणि चाकवत यासारख्या पालेभाज्यांची एक जुडी पंचवीस ते तीस रुपयांच्या दरम्यान आहे.अजूनही बऱ्याच भागांमध्ये पावसाचा जोर असून पुणे जिल्ह्यातील बऱ्याच भागांमध्ये पाऊस सुरू असून त्या ठिकाणी पालेभाज्यांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.
पुणे शहराला बारामती व सासवड सारख्या भागातून पालेभाज्यांची मोठ्या प्रमाणावर आवक होते परंतु या ठिकाणी होत असलेल्या पावसामुळे पालेभाज्या खराब झाले असून फळभाज्यांच्या देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने त्याचा परिणाम हा संबंधित भाजीपाला व फळ भाज्यांची आवक घटण्यावर झाला आहे.
Published on: 12 August 2022, 02:10 IST