News

महाराष्ट्रामध्ये उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. हक्काचे नगदी पीक म्हणून ऊस पिकाकडे पाहिले जाते. महाराष्ट्रामध्ये उसाची लागवड प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात होते. सिंचनाच्या सोयी तसेच आर्थिकदृष्टया परवडणारे पीक म्हणून शेतकरी उसाची लागवड मोठ्या प्रमाणात करतात.

Updated on 16 June, 2022 9:12 AM IST

महाराष्ट्रामध्ये उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. हक्काचे नगदी पीक म्हणून ऊस पिकाकडे पाहिले जाते. महाराष्ट्रामध्ये उसाची लागवड प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात होते. सिंचनाच्या सोयी तसेच आर्थिकदृष्टया परवडणारे पीक म्हणून शेतकरी उसाची लागवड मोठ्या प्रमाणात करतात.

तसे पाहायला गेले तर उसाच्या खूप प्रकारच्या वेगळ्या जाती आहेत. यामध्ये को 86032 ही जात  शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेली जात आहे.सध्या शेतकरी आणि साखर कारखान्यांमध्ये ही जात मोठ्या प्रमाणात वापरली जाते.

उसाच्या नवनवीन बियाण्यांच्या संदर्भात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये कायमच वेगवेगळे प्रयोग घेतले जातात. या प्रयोगांचा फायदा शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात होत असतो आणि त्यातच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची काही उत्पादने आहेत, ती शेतकऱ्यांना खूप फायद्याची ठरत असल्यामुळे शेतकरी देखील या व्हीएसआयच्या अर्थात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून उपयुक्त उत्पादन ते घेतात.

नक्की वाचा:उसावरील रसशोषक (पायरीला पांढरी माशी )किडींचे व्यवस्थापन

याच पार्श्वभूमीवर व्हीएसआय कडून नवीन ऊसाच्या जाती चा शोध लावण्यात आला असूनजवळ जवळ मागच्या सात वर्षापासून साखर कारखान्यांच्या चर्चेत ही जात आहे.

ती जात म्हणजे 'को व्हीएसआय 18121'ही होय. या जातीच्या चाचणी आता अंतिम टप्प्यात आले असून लागवडीसाठी 2024 पर्यंत व्हीएसआयकडून या जातीची शिफारस करण्यात येणार असल्याची शक्‍यता असल्याचे माहिती देण्यात आली.

जर आपण को 86032 या उसाच्या जातीचा विचार केला तर या जातीच्या तुलनेत को व्हीएसआय 18121 ही जात सरस ठरत आहे. या वानावर गेल्या काही वर्षापासून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आणि आयसीएआर अर्थात भारतीय कृषी संशोधन परिषद संयुक्तपणे संशोधन करीत आहेत.

को व्हीएसआय 18121 ही जात को-86032 व को 8201 या दोन वाणाच्या संकराच्या माध्यमातून तयार करण्यात आली आहे.

नक्की वाचा:हटके माहिती: टोमॅटो सॉस बनवण्यासाठी उपयुक्त आहे 'रोमा टोमॅटो', जाणून घेऊ योग्य वाढवण्यासाठीच्या टिप्स

आतापर्यंत या वाणांच्या चाचण्या समाधानकारकपणे सुरु आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने 2018 मध्ये पाण्याचा ताण सहन करू शकणारी 08005 ऊसाची नवीन जात प्रसारित केली होती

त्यामुळे महाराष्ट्राच्या दुष्काळी भागात अर्थात जिथे पाण्याची कमी असते अशा भागात देखील उसाची लागवड मोठ्या प्रमाणात वाढली.

को व्हीएसआय 18121 या वाणाच्या चाचणी अजून काही महिने चालतील असे सांगितले जात असून 2024 ते 25 पर्यंत या वाणाच्या गाळप चाचण्या होतील व त्या माध्यमातून निष्कर्ष पाहून सार्वत्रिक लागवडीसाठी शिफारस केली जाईल अशी माहिती, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सूत्रांनी ॲग्रोवन ला दिली.

नक्की वाचा:Maize Variety: मक्याच्या सुधारित जाती आणि त्यांच्या विशेषता

English Summary: vasantdada suger institute reserch on canecrop new veriety co vsi 18121
Published on: 16 June 2022, 09:12 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)