News

कृषी विद्यापीठच आम्हा शेतकऱ्यांसाठी ज्ञानाचे मंदिर:- जनार्दन मोगल

Updated on 19 October, 2022 1:44 PM IST

कृषी विद्यापीठच आम्हा शेतकऱ्यांसाठी ज्ञानाचे मंदिर:- जनार्दन मोगलअकोला कृषी विद्यापीठ खरीप शिवार फेरीचे शानदार उद्घाटन संपन्न!वैदर्भीय शेतकरी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी व त्याचा अवलंब करण्यासाठी आतुर असल्याचे आज धो धो बरसणाऱ्या पावसातही शिवार फेरीला मिळालेल्या उदंड प्रतिसादाने सिद्ध झाल्याचे गौरवोद्गार डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ शरद गडाख यांनी काढले. विद्यापीठाच्या शिवार फेरी निमित्त आयोजित चर्चासत्राचे प्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते.अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी

विद्यापीठाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत विदर्भासह राज्यातील शेतकरी बांधवांना शेती व्यवसायात नवनवीन तंत्रज्ञान अवगत होण्याचे हेतूने 53 वर्षापासून ची विद्यापीठ शिवार फेरीची परंपरा यंदाही कायम राखली. आज साक्षात वरून राजाच्या साक्षीने विदर्भातील अकोला वर्धा यवतमाळ व गडचिरोली जिल्ह्यातील तब्बल 1750 शेतकरी बंधू-भगिनींनी शिवार फेरीत सहभाग नोंदवत नवीन तंत्रज्ञान आम्ही अग्रेसर आहोत याचे साक्षात दर्शन घडविले.We have clearly demonstrated that we are leaders. विद्यापीठातील शेतकरी सदनाच्या प्रांगणात सकाळी नऊ वाजता खरीप शिवार फेरी 2022 चा शुभारंभ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांचे

अध्यक्षतेत संपन्न झाला. याप्रसंगी विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य तथा विधान परिषद सदस्य माननीय आमदार श्री विप्लव बाजोरिया, कार्यकारी परिषद सदस्य श्री विठ्ठल सरप पाटील, नवनियुक्त कार्यकारी परिषद सदस्य श्री. जनार्दन मोगल यांचेसह संचालक संशोधन डॉ. विलास खर्चे, संचालक विस्तार शिक्षण डॉ. धनराज उंदीरवाडे, अधिष्ठाता कृषी डॉ. शामसुंदर माने, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. सुधीर वडतकर, अधिष्ठाता उद्यानविद्या डॉ. देवानंद पंचभाई, कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे, विद्यापीठ अभियंता श्रीमती रजनी लोणारे, विद्यापीठ नियंत्रक श्री प्रमोद पाटील,

प्रगतिशील शेतकरी श्री जामदार, श्री नामदेव आढाव यांची विशेषत्वाने उपस्थिती होती. विद्यापीठ पृथ्वीप्रमाणे प्रथम नोंदणी करणारे शेतकरी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील श्री दिलीप नानाजी पोहाणे यांचे शुभ असते फीत कापून शिवारफेरीचे रीतसर उद्घाटन करण्यात आले तर मान्यवरांचे शुभ हस्ते शिवाय फेरीसाठी पहिल्या बसला हिरवी झेंडी दाखवून शिवार फेरीची सुरुवात करण्यात आली. आकाशात ढगांची प्रचंड गर्दी झालेली असताना नोंदणीसाठी संपूर्ण विदर्भातील येणार आहे शेतकरी बंधू भगिनींची संख्या ही प्रचंड प्रमाणात वाढत होती आणि धो धो बरसणाऱ्या

पावसातही शेतकरी बंधू नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी आतुर असल्याचे दिसून आले तर विद्यापीठ शास्त्रज्ञ आणि अधिकारी आपले सर्वतोपरी देण्याचा प्रयत्न या निमित्ताने करताना दिसत होते. उद्यान विद्या विभाग सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र शेतमाल प्रक्रिया तंत्रज्ञान विभाग कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय कापूस संशोधन विभाग लिंबूवर्गीय फळे संशोधन विभाग सोयाबीन प्रक्षेत्र ज्वारी संशोधन विभाग धान्य संशोधन विभाग तेलबिया संशोधन विभाग कोरडवाहू संशोधन विभाग यासह पशुसंवर्धन दुग्धशास्त्र विभाग आणि नागार्जुन वनौषधी उद्यानाला शेतकरी बंधू-भगिनींची गर्दी

झालेली पाहून विद्यापीठातील सर्वांचाच उत्साह द्विगुणीत झाला होता दुपारच्या सुमारास विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभ सभागृहात शिवार फेरीत सहभागी शेतकरी बंधू-भगिनींसाठी स्वादिष्ट भोजनाची व्यवस्था विद्यापीठ प्रशासनाद्वारे करण्यात आली होती दुपारचे सत्रात कृषी महाविद्यालय अकोला च्या स्वर्गीय के आर ठाकरे सभागृहात कुलगुरू डॉ. शरद गडाख यांचे अध्यक्षतेत संपन्न झालेल्या चर्चासत्रात विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य श्री जनार्दन मोगल प्रगतशील शेतकरी प्रतिनिधी श्री नामदेवराव आढाव श्री जामदार काका यांचेसह संचालक संशोधन डॉ. विलास खर्चे,

संचालक विस्तार शिक्षण डॉ. धनराज उंदीरवाडे, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. सुधीर वडतकर, अधिष्ठाता उद्यानविद्या डॉ. देवानंद पंचभाई, यांची व्यासपीठावर उपस्थिती होती या चर्चासत्राचे प्रसंगी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी उपस्थित शेतकरी बांधवांचे शंका समाधान करीत त्यांच्या प्रश्नांना समर्थक अशी उत्तर दिली. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे नवनियुक्त सदस्य श्री जनार्दन मोगल यांनी कृषी विद्यापीठाच शेतकरी वर्गासाठी मंदिर असून येथील तंत्रज्ञान आम्हा शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनीच आहे फायद्याच्या शेतीचे साधे सोपे उपाय या ठिकाणी शेतकऱ्यांनी या

संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. शिवार फेरीचे यशस्वी आयोजनासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांचे मार्गदर्शनात संचालक विस्तार शिक्षण डॉ. धनराज उंदीरवाडे यांचे नेतृत्वात सर्व समित्यांचे अध्यक्ष, सदस्य, सचिव यांचे सह विद्यापीठातील सर्वच वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ, विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी वर्गाने अथक परिश्रम घेतले.बुधवार दिनांक 19 ऑक्टोबर रोजी शिवार फेरीचा दुसरा दिवस असून विदर्भातील तसेच राज्यातील शेतकरी बंधू-भगिनींनी याशिवायफेरीचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन विद्यापीठाचे वतीने करण्यात आले आहे.

राज्याचे कृषिमंत्री माननीय नामदार अब्दुल सत्तार साहेब दिनांक 20 ऑक्टोबर रोजी अकोल्यातडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या स्थापना दिवसाचे निमित्ताने आयोजित शिवार फेरीला भेट देत शेतकरी तथा शास्त्रज्ञासोबत हितगुज साधण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री तथा प्रतिकूलपती कृषी विद्यापीठे माननीय नामदार श्री अब्दुल सत्तार साहेब गुरुवार दिनांक 20 ऑक्टोबर रोजी अकोला येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात विशेषत्वाने येणार आहेत. याप्रसंगी प्रधान सचिव कृषी माननीय श्री एकनाथ डवले यांची सुद्धा विशेष उपस्थिती लाभणार आहे.

English Summary: Vaidharbha farmers are pioneers in adopting modern technology :- Vice-Chancellor Dr. Sharad Gadakh
Published on: 19 October 2022, 01:44 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)