News

किनगाव राजा पशुवैद्यकीय पशुसंवर्धन यांच्या वतीने किनगाव राजा इथून जवळ असलेल्या पांगरी उगले

Updated on 19 December, 2022 4:46 PM IST

किनगाव राजा पशुवैद्यकीय पशुसंवर्धन यांच्या वतीने किनगाव राजा इथून जवळ असलेल्या पांगरी उगले या गावामध्ये जनावरांना लाळ खुरकूत प्रतिबंधक लस देण्यात आली. १९ डिसेंबर रोजी सादर लसीकरण मोहीम पार पडली. गावकऱ्यांनी गावातील हनुमान मंदिरावर लसीकरणाबाबतची अनाउन्समेंट केली. त्यानंतर गावातील शेतकऱ्यांनी व गोपालकांनी

आपले गुरे हनुमान मंदिराच्या जवळ आणून पशुधन पर्यवेक्षक डॉ. गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. गोविंद उगले व डॉ.विकास गायकवाड यांनी गावातील गुरांना लसीकरण केले.Livestock Supervisor Dr. Under the guidance of Dr. Gadekar. Govind Ugle and Dr. Vikas Gaikwad vaccinated the cattle of the village.त्यावेळी शेतकऱ्यांमध्येही या रोगाची जनजागृती हवी या हेतूने डॉ. गाडेकर म्हणाले की लाळ खुरकूत रोगमुक्त लाळ खुरकूत हा विषाणूजन्य रोग आहे. या रोगास प्रतिबंध करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून नियमितपणे लसीकरण मोहीम राबवण्यात येते. 

शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांना ही लस देवून जनावरे संबधित आजारापासून संरक्षित करावित, असे आवाहन पशुधन पर्यवेक्षक डॉ. गाडेकर यांनी केले आहे.लाळ खुरकूत या आजारामुळे तोंड व खुरात जखमा होतात. त्यामुळे जनावर चारा खाणे बंद करतात. तोंडातून लाळ गळते. जनावर चालताना लंगडते. ताप येतो. जनावरांमध्ये थकवा निर्माण होऊन कोणतेही काम करू शकत नाही. ही या आजाराची

लक्षणे आहेत. या आजारावर वेळीच उपचार न झाल्यास जनावर मृत्युमुखी पडते. प्रामुख्याने लाळ खुरकत रोग प्रामुख्याने गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्या तसेच बैल या जनावरांमध्ये आढळतो. रोगाचे निर्मूलन करण्यासाठी तसेच नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे.त्यावेळी गावातील शेतकरी मोठ्या संख्येने आपले जनावरे उपस्थित ठेवून स्वतः उपस्थित होते.

वृत्तांकन - गोपाल उगले

English Summary: Vaccination against scabies was completed in Pangri Ugle village while Dr. Gadekar gave awareness lessons to the farmers
Published on: 19 December 2022, 04:46 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)