News

औरंगाबाद: राज्यातील परभणी, राहुरी, अकोला व दापोली या कृषी विद्यापीठातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या जागा मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. ही चारही कृषी विद्यापीठातील (University of Agriculture) शिक्षक (teacher)-शिक्षकेतर कर्मचार्‍यांची रिक्त पदे (Staff Vacancies) तातडीने भरली जातील असे राज्याचे कृषी मंत्री (State Agriculture Minister) दादाजी भुसे (Dadaji Bhuse) यांनी विधान परिषदेत (Legislative Council) सांगितले. यासंदर्भात मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले.

Updated on 29 December, 2021 7:51 PM IST

४८ टक्के तर एकट्या परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात (University of Agriculture) जवळपास ५४ टक्के जागा रिक्त असून याचा थेट परिणाम या विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांवर होत असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले होते. 

१२ ऑगस्ट २०२१ च्या शासन निर्णयानुसार कृषी विद्यापीठातील शिक्षकवर्गीय अधिकारी/कर्मचार्‍यांच्या शैक्षणिक पात्रतेत बदल करण्यात आले आहेत. त्यांच्या या शैक्षणिक पात्रतेत केलेले बदल लागू करण्यासाठी महाराष्ट्र कृषी विद्यापीठ परिनियम १९९९ मध्ये सुधारणा केल्यानंतरच शिक्षकवर्गीय अधिकारी/कर्मचार्‍यांच्या पदोन्नतीचा मार्ग सुकर होणार आहे.

English Summary: Vacancies for teachers and non-teaching staff in all the four agricultural universities in the state will be filled
Published on: 29 December 2021, 07:32 IST