News

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जवळ जवळ तेरा लाख शेतकऱ्यांना एक मोठी भेट दिली आहे. उत्तर प्रदेश सरकार ने शेतकऱ्यांना विज दरामध्ये 50 टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे शेतीमध्ये लागणारा खर्च कमी होण्यास मदत होईल तसेच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात देखील वाढ होण्याची शक्यता आहे.

Updated on 08 January, 2022 2:52 PM IST

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जवळ जवळ तेरा लाख शेतकऱ्यांना एक मोठीभेट दिली आहे. उत्तर प्रदेश सरकार ने शेतकऱ्यांना विज दरामध्ये 50 टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे शेतीमध्ये लागणारा खर्च कमी होण्यास मदत होईल तसेच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात देखील वाढ होण्याची शक्यता आहे.

याअगोदर आंध्र प्रदेश,कर्नाटक, तामिळनाडू, पंजाब आणि तेलंगणा येथील शेतकऱ्यांना वीजबिलात संपूर्ण माफी देण्यात आली आहे.उत्तर प्रदेश मधील शेतकरी बऱ्याच दिवसांपासून वीजदर कमी करण्याची मागणी करीत होते.

 उत्तर प्रदेश सरकारच्या या निर्णयामुळे तेथील शेतकऱ्यांना खूप फायदा होणार आहे. एका अंदाजानुसार वीज बिलातील सूट या निर्णयामुळे उत्तर प्रदेश पावर कार्पोरेशन लिमिटेड वर वर्षाला एक हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार आहे.

यासाठी राज्य सरकारने उत्तर प्रदेश पावर कार्पोरेशन लिमिटेड ला अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. ही माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विट केली आहे.

 जाणून घेऊन नवीन दर कसे असतील?

  • ग्रामीण भागातील मीटर कनेक्शन वर दोन रुपये प्रति युनिट दराने वीज बिल भरावे लागते. आता या निर्णयामुळे तिथे केवळ एक रुपया प्रति युनिट हा दर असेल.
  • या कनेक्शन चा फिक्स चार्ज 70 रुपयांऐवजी आता 35 रुपये प्रति हॉर्सपावर राहील.
  • मीटर नसलेल्या कनेक्शन साठी 85 रुपये प्रति हॉर्स पावर दराने फिक्स चार्ज 170 रुपये पर हॉर्स पावर राहील.
  • एनर्जी एफिशियंट पंप साठी वर्तमान परिस्थितीत 65 रुपये प्रति युनिट दर आकारला जातो. आता तेथील शेतकऱ्यांना केवळ हा दर 0.83 रुपये प्रति युनिट भरावा लागेल.
English Summary: uttar pradesh goverment give 50 persent discount to electricity bill rate to farmer
Published on: 08 January 2022, 02:52 IST