शेतीमधून उत्पादन वाढावे यासाठी शेतकरी आपल्या शेतामध्ये अनेक विविध प्रकारचे प्रयोग करत असतो. शेतातून जर उत्पादन काढायचे असेल तर त्यासाठी सर्वात लागते म्हणजे पाणी. मागील दोन वर्षात शेतीला पाण्याची कमी न्हवती मात्र यंदा पाण्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्याना पाण्याची खूप मोठी झळ बसलेली आहे. पाण्याची बचत करण्यासाठी शेतकरी ठिबक सिंचनाचा वापर करत आहेत. पिकाला योग्य प्रमाणात पाणी मिळत असल्यामुळे पिकांच्या उत्पादनात वाढ ही झाली आहे. अजूनही काही शेतकरी याचा वापर करत नाहीत मात्र पिकांच्या वाढीसाठी ही प्रणाली खूप महत्त्वाची आहे. ठिबक सिंचनाद्वारे पाणी दिल्यामुळे पिकाच्या मुळापर्यंत तर पाणी पोहचतेच तसेच पिकांना समप्रमाणत पाणी मिळते. यामुळे जमिनीची सुपीकता सुद्धा टिकून राहते त्यामुळे शेतकऱ्यांनी फळबाग तसेच ऊस या पिकांना डबल ड्रीप वापरावे.
असा करा ‘डबल ड्रीप’ चा वापर :-
ठिबक सिंचनाचा वापर करून पिकाच्या उत्पादनात तर वाढ होतेच पण पाणी सुद्धा वाया जात नाही. ठिबक सिंचनामुळे पाण्याचा तर योग्य प्रमाणत वापर होत आहेत पण त्याचसोबत दिलेल्या अन्नद्रव्यांचा सुद्धा योग्य वापर होत आहे.ठिबक सिंचनाचा वापर पीक पद्धती, जमिनीचा प्रकार, चढ – उतार, जमिनीत पाणी मुरण्याचा वेग आणि पाणी शोषून घेण्याची क्षमता, जमिनीची जलधारण क्षमता, जमिनीत होणारे पाण्याचे उभे-आडवे प्रसरण तसेच पिकांची उन्हाळ्यात जोमाने वाढ होतो.
या पिकांसाठी अधिकचा फायदा :-
शेतामध्ये ज्या पिकांची पेरणी करून ज्याचे उत्पादन घेतले जाते त्यासाठी डबल ड्रीप चा वापर होत नाही. डबल ड्रीप या आधुनिक प्रणाली चा वापर फळझाडे, ऊस या पिकासाठी केला जातो तर द्राक्ष, आंबा, पेरू, डाळिंब, लिंबू, पपई, केळी, सीताफळ, संत्रा, मोसंबी या पिकांना ठिबक सिंचन उपयुक्त ठरते. या आधुनिक प्रणालीमुळे शेतीची कामे सुद्धा योग्य प्रकारे होतात आणि वेळेची बचत ही होते.
किडीचा प्रादुर्भाव कमी अन् दर्जात्मक उत्पादन :-
डबल ड्रीप या आधुनिक प्रणाली चा वापर करून झाडांच्या दोन्ही बाजूच्या मुळांना ओलावा राहील असे पाणी जाते. मुळांना योग्य प्रमाणात अन्नद्रव्ये तसेच पाणी भेटल्याने मुळांची योग्य प्रकारे वाढ सुद्धा होते. डबल ड्रीप ने पाणी दिल्यामुळे जमिनीचे तापमान योग्य प्रमाणात राहते तसेच झाडांची सर्व बाजूने एकसमान वाढ होते आणि जमिनीची धूप सुद्धा थांबते. पिकांवरील किडीचा प्रादुर्भाव देखील कमी होऊन उत्पादनात देखील वाढ होते.
Published on: 25 February 2022, 06:10 IST