महाराष्ट्रात ऊसाची व साखरेची उत्पादकता वाढविण्यासाठी आधुनिक ऊस शेतीचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना माहित होणे आणि प्रत्यक्ष त्याचा वापर शेतीमध्ये होणे हि काळाची गरज आहे. या उद्देशाने मागील 29 वर्षापासून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट तर्फे प्रत्येक वर्षी ऊस उत्पादक पुरुष शेतकऱ्यांसाठी ऊस शेती ज्ञानयाग व महिला शेतकऱ्यांसाठी ऊस शेती ज्ञानलक्ष्मी प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जातात. या प्रशिक्षणास लाभणारा मोठा प्रतिसाद लक्षात घेता आणि त्याची व्याप्ती वाढावी म्हणून मागील 3 वर्षापासून दोन टप्प्यात (जून-जुलै आणि नोव्हेंबर-डिसेंबर) महिन्यांत प्रशिक्षण घेण्याचे ठरविलेले आहे. या वर्षी माहे नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यांत घेण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे
अ.क्र |
कार्यक्रमाचे नाव |
समाविष्ट जिल्हे |
कालावधी |
1 |
ऊस शेती ज्ञानयाग |
विदर्भ आणि कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांचे पुरुष शेतकरी |
13 ते 17 नोव्हेंबर 2018 |
2 |
ऊस शेती ज्ञानयाग |
सांगली, सातारा जिल्ह्यातील तसेच मराठवाडा आणि खानदेश विभागातील कारखान्यांचे पुरुष शेतकरी |
27 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2018 |
3 |
ऊस शेती ज्ञानयाग |
पुणे, सोलापूर, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील आणि इतर राज्यातील कारखान्यांचे पुरुष शेतकरी |
4 ते 8 डिसेंबर 2018 |
4 |
ऊस शेती ज्ञानलक्ष्मी |
महाराष्ट्रातील सर्व कारखाने व इतर राज्यातील सदस्य कारखाने यांच्या महिला शेतकऱ्यांसाठी |
11 ते 15 डिसेंबर 2018 |
ऊस शेती ज्ञानयाग या कार्यक्रमाचे हे एकोणिसावे वर्ष असून ऊस शेती ज्ञानलक्ष्मी या कार्यक्रमाचे हे चौदावे वर्ष आहे. वरील कार्यक्रमात आतापर्यंत जवळजवळ 20,404 शेतकरी प्रशिक्षित झालेले आहेत. सदर कार्यक्रमात ऊस शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान या विषयावर प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले जाते. प्रशिक्षणार्थीची राहण्याची व ज्वेनाची सोय संस्थेच्या वस्तीगृहात केली जाते, तसेच प्रशिक्षण सहित्य म्हणून त्यांना बॅग, पुस्तिका, पॅड व पेन देखील पुरविले जाते व प्रशस्तीपत्रक दिले जाते.
तरी आपण कृपया आपल्या साखर कारखाना कार्यक्षेत्रातील जास्तीत-जास्त ऊस उत्पादक पुरुष व महिला शेतकऱ्यांना वरील कालावधीत प्रशिक्षणासाठी पाठवून प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा. प्रशिक्षणार्थींनी कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी मांजरी येथील संस्थेच्या वस्तीगृहात मुक्कामास यावे. प्रशिक्षणासाठी प्रत्येक प्रशिक्षणार्थीस रु. 2,500/- या प्रमाणे फी आकारण्यात येईल.
अधिक माहितीसाठी संपर्क:
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट
मांजरी (बुद्रुक), ता. हवेली
पुणे 412307
020 26902100
020 26902211
Published on: 10 November 2018, 07:46 IST