News

भारतातील शेतकरी आंदोलनाची चर्चा आता आंतरराष्ट्रीय पातळीवर होऊ लागली आहे. शेतकरी आंदोनलनाला ग्लोबल सेलिब्रिटींकडून पाठिंबा मिळत असून आता अमेरिकेने या आंदोलनावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेने भारताच्या नवीन कृषी कायद्यांचे स्वागत केले आहे. अमेरिकेने असं म्हटलं आहे की, जगातील बाजारावर नव्या कृषी कयद्यामुळे प्रभाव वाढेल. अशा प्रकारच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.

Updated on 04 February, 2021 4:45 PM IST

भारतातील शेतकरी आंदोलनाची चर्चा आता आंतरराष्ट्रीय पातळीवर होऊ लागली आहे.
शेतकरी आंदोनलनाला ग्लोबल सेलिब्रिटींकडून पाठिंबा मिळत असून आता अमेरिकेने या आंदोलनावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेने भारताच्या नवीन कृषी कायद्यांचे स्वागत केले आहे. अमेरिकेने असं म्हटलं आहे की, जगातील बाजारावर नव्या कृषी कयद्यामुळे प्रभाव वाढेल. अशा प्रकारच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.

हेही वाचा : संयुक्त किसान मोर्चा ६ फेब्रुवारीला करणार देशव्यापी चक्का जाम

शेती कायद्यास शांततापूर्ण विरोध हा भरभराट होणाऱ्या लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे. एखाद्या कायद्याबद्दल मतभेद असतील तर ते चर्चेतून दूर करता येऊ शकतात. अमेरिकेने म्हटले की, भारताच्या बाजाराची कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि खासगी क्षेत्रातील गुंतवणुकीला आकर्षित करणाऱ्यांचे स्वागत आहे.
परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्यांनी म्हटलं की, बायडेन सरकार कृषी क्षेत्रात सुधारणा करण्याच्या दृष्टीने भारत सरकारच्या निर्णयाचे समर्थन करते.

 

नवीन कृषी कायदे खासगी गुंतवणुकीस आकर्षित करतात आणि शेतकर्‍यांसाठी अधिकाधिक बाजारपेठांना आकर्षित करू शकतात. अमेरिकेने भारताच्या बाजाराची कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि खासगी क्षेत्रातील गुंतवणुकीला आकर्षित करणाऱ्या निर्णयाचे स्वागत केले आहे, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

English Summary: US response to the peasant movement; Avoid disagreements
Published on: 04 February 2021, 03:41 IST