बुलडाणा येथे स्वाभिमानीच्या शिष्टमंडळाने घेतली अप्पर जिल्हाधिकारी सुनील विंचनकर यांची भेट घेतली आहे. यावेळी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर केली चर्चा करण्यात आली. जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने बुलढाणा जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
पाऊस नसल्याने पिके सुकून गेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादनात घट येणार आहे. आता पाऊस पडला तरी पाहिजे तसे उत्पादन येणार नाही. अशावेळी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीचा हात मिळणे गरजेचे आहे.
त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात दुष्काळ घोषित करून शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी. तसेच जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद, संग्रामपूर, शेगाव, मलकापूर व नांदुरा तालुक्यात महापूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती.
चंदनाच्या लागवडीतून करोडोंची कमाई, जाणून घ्या..
नद्यांना आलेल्या पुरांमुळे पाचही तालुक्यात प्रचंड नुकसान झाले आहे. हजारो हेक्टर जमीन खरडून गेली आहे, मोठ्या प्रमाणात शेतीपिके उध्वस्त झाली तर हजारो जनावरे वाहून गेल्याने पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे.
शेकडो घरे वाहून गेल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे. तर अनेक घरांमध्ये पुराचे पाणी घुसल्याने संसार उपयोगी साहित्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य शासनाने सानुग्रह अनुदान व मदतीची घोषणा केली. पण जाहीर केलेली मदत अतिशय तुटपुंजी आहे व ती सुद्धा पूर्णपणे नुकसान ग्रासतांना अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे पूरग्रस्तांना सरसकट नुकसान भरपाई मिळण्यासाठी व पूरग्रस्तांच्या इतर मागण्यासाठी राज्य सरकारकडे तातडीने पाठपुरावा करावा.
पांढऱ्या कांद्याच्या लागवडीमुळे शेतकऱ्यांना मिळेल चांगला नफा, जाणून घ्या त्याची योग्य पद्धत..
तसेच मागील वर्षी अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. बुलढाणा जिल्ह्यात सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी 174 कोटी रुपये मंजूर झाले आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना मदती ही मिळाली, परंतु अजूनही 50 हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांना मदत मिळणे बाकी आहे. त्या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी व सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीसाठी बुलढाणा जिल्ह्याला ११४ कोटी ९० लक्ष रुपये मंजूर आहेत.
सदर रक्कम अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नाही ती मदत तात्काळ शेतकऱ्यांना देण्यात यावी. या मागण्यांसंदर्भात शिष्टमंडळाने सविस्तर चर्चा करून जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर टाले, दत्तात्रय जेऊघाले, गजानन देशमुख, एलियाज सौदागर, विठ्ठल इंगळे, कबीर मुफिस, जिया उस्मान व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
शेतकऱ्यांनो या उपकरणाने प्राण्यांचे सर्व रोग ओळखले जातील, वाचा संपूर्ण माहिती
Published on: 13 September 2023, 09:23 IST