News

सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये जोरदार युद्ध सुरु आहे याच पद्धतीने राज्यात देखील एक युद्ध सुरु आहे; हो, बरोबर ऐकलं आपण! शेतकऱ्यांसाठी राज्यात युद्धजन्य परिस्थितीच निर्माण झाली आहे असं म्हणणं काही वावगं ठरणार नाही; विशेषtaकोल्हापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी गृहयुद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून युरियाची भीषण टंचाई भासत आहे, जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पिकांना युरियाची अतोनात गरज आहे आणि नेमक्या याच वेळी युरियाची टंचाई रब्बी हंगामातील पिकांना मोठा फटका देऊ शकतो अशी भीती शेतकऱ्यांना आहे.

Updated on 03 March, 2022 7:08 PM IST

जिल्ह्यातील या परिस्थितीमुळे शेतकरी बांधव पुरता हवालदिल झाला आहे आणि लवकरात लवकर युरियाची टंचाई दूर होईल याची भोळीभाबडी आशा बाळगून आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, कच्च्या मालाच्या भीषण तुटवड्यामुळे युरियाची टंचाई जाणवत आहे. सध्या जिल्ह्यात सर्वत्र ऊस लागवड व खोडवा उसाला पाणी भरण्याचे काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना युरियाची सर्वात जास्त आवश्यकता भासली आहे. शेतकरी बांधव युरिया खरेदी करण्यासाठी आपल्या जवळच्या कृषी केंद्रात जातात आणि युरियाची मागणी करतात मात्र कृषी केंद्र चालकांद्वारे युरिया नसल्याचे सांगितले जाते, तर असे अनेक कृषी केंद्र चालक आहेत जे लिंकिंग पद्धतीने युरिया विकत आहेत म्हणजेच युरिया घ्यायचा असेल तर अमुक-अमुक खतांची बॅग घ्यावी लागेल अशी सक्ती करत असल्याचे बघायला मिळत आहे.

शेतकऱ्यांना फक्त युरियाची आवश्यकता असते मात्र इतरत्र कुठेच युरिया मिळत नसल्याने शेतकऱ्यांना अनावश्‍यक कीटकनाशक किंवा खतांची खरेदी करणे भाग पडत आहे यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात नाहक वाढ होत आहे. जिल्ह्यातील ही परिस्थिती बघता शेतकरी बांधवांनी शासनाने जास्तीत जास्त युरिया जिल्ह्यात उपलब्ध करून द्यावा अशी आर्त हाक मायबाप सरकारकडे  घातली आहे. युरिया खताचा तुटवडा असल्याने अनेक शेतकऱ्यांचे ऊसाला तसेच खोडवा उसाला पाणी भरण्याचे कार्य रखडले आहे. ऊस व्यतिरिक्त मका, सोयाबीन,भात इत्यादी पिकांना देखील युरियाची अतोनात आवश्यकता आहे. 

मात्र युरिया उपलब्ध होत नसल्याने या पिकांचे देखील मोठे नुकसान होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. जिल्हा कृषी अधीक्षक यांनी खताबाबत माहिती देताना सांगितले की, या 15 फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यात सुमारे 94 हजार टन युरियाची अपूर्ती केली गेली आहे. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, रब्बी आणि खरीप हंगाम दोघं मिळून एकट्या कोल्हापूर जिल्ह्याला 1 लाख 22 हजार टन युरियाची आवश्यकता असते, म्हणजे अजून जिल्ह्याला 28 टन युरियाची कमी पूर्तता झाली आहे. 

English Summary: UREA SHORTAGE IN KOLHAPUR FARMERS ARE IN TROUBLE
Published on: 03 March 2022, 07:08 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)