News

दिवाळी मुळे सगळ्या बाजार समित्या बंद होत्या. मात्र आता दिवाळीनंतर पुन्हा बाजार समिती सुरू झाल्याने शेतकऱ्यांना आशा आहे ती सोयाबीनचे दर बाबतची दिवाळीनंतर सोयाबीनच्या दरात तेजी होईल की घसरण याबाबत शेतकऱ्यांच्या कमालीची उत्सुकता लागली होती.

Updated on 08 November, 2021 9:06 PM IST

दिवाळी मुळे सगळ्या बाजार समित्या बंद होत्या. मात्र आता दिवाळीनंतर पुन्हा बाजार समिती सुरू झाल्याने शेतकऱ्यांना आशा आहे ती  सोयाबीनचे दर बाबतची दिवाळीनंतर सोयाबीनच्या दरात तेजी होईल की घसरण याबाबत शेतकऱ्यांच्या कमालीची उत्सुकता लागली होती.

 परंतु दिवाळीनंतर सुद्धा सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांच्या पदरी निराशाच पडली आहे.  जर दीपावली पाडव्याच्या विचार केला तर त्या दिवशी सोयाबीनच्या आवक वाढली होती. त्यावेळी 5200 रुपयाचा भाव मिळाला होता.सोमवारी आवक कमी झाली मात्र दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले.  लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सोयाबीनचे दर 150 रुपयांनी घसरले.

 दिवाळीनंतर सोयाबीनच्या भावात सुधारणा होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र दिवाळीनंतर सुद्धा पहिल्याच दिवशी बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरात घसरण पाहायला मिळाली.त्यामुळे भविष्यात काय होणार याची चिंता कायम आहे.हंगामाच्या सुरुवातीला सोयाबीनच्या वाढत्या दरामुळेआशादायी चित्र निर्माण झाले होते.

पण वाढते दर हे काही दिवसांत पुरतेच मर्यादित राहिली. गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेली घसरण कायम आहे.

 उडदाच्या दरात वाढ

 उडदाच्या दरामध्ये चांगली वाढ दिसत आहे. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीमध्ये उडदाची विक्री करून शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची तयारी केली होती. दिवाळीच्या अगोदर बाजार समित्या बंद होण्यापूर्वी उडदाला सात हजार रुपयाचा भाव होता.सोमवारी उडीदला सात हजार 400 रुपयांचा भाव मिळाला. आतापर्यंत उडदाच्या दरात घसरण तर झालीच नाही पण दर स्थिर राहिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

सोयाबीनच्या दरात मात्र शेतकऱ्यांची निराशा केली आहे.

 इतर शेतमालाचे भाव

 लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी बाराच्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. सोमवारी लाल तूर सहा हजार दोनशे रुपये क्विंटल, पांढरी तूर 6150 रुपये क्विंटल, जानकी चना चार हजार आठशे रुपये क्विंटल विजय चना 4950,चना मिल 4800, सोयाबीन 5300,  चमकी मूग 7200,  मिल मूग6250 तर उडीदसात हजार चारशे रुपये एवढा राहिला होता. (संदर्भ- हॅलो कृषी)

English Summary: urad rate in market is growth after diwali but soyabioen rate is decrease
Published on: 08 November 2021, 09:06 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)