News

UPSC Result : केंद्रीय लोकसेवा आयोग 2021 (UPSC 2021) परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यावर्षी मुलींनी बाजी मारली आहे. पहिल्या चार स्थानांवर मुली आल्या आहेत. श्रुती शर्मा ही देशातून पहिली आलेली विद्यार्थीनी आहे.

Updated on 30 May, 2022 6:12 PM IST

UPSC Result : केंद्रीय लोकसेवा आयोग 2021 (UPSC 2021) परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यावर्षी मुलींनी बाजी मारली आहे. पहिल्या चार स्थानांवर मुली आल्या आहेत. श्रुती शर्मा ही देशातून पहिली आलेली विद्यार्थीनी आहे. तर महाराष्ट्रातून पहिला क्रमांक प्रियवंदा अशोक म्हाडदळकर (Priyamvanda Mhaddalkar) हीने पटकावला आहे. हा निकाल केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

प्रियवंदा महाराष्ट्रातून पहिली

प्रियवंदा ही महाराष्ट्रातून पहिली आली असून देशातून तिचा तेरावा क्रमांक लागला आहे. दरम्यान देशातील अव्वल पाच उमेदवारांमध्ये चार मुलींचा सामावेश आहे. महाराष्ट्रातील २८ विद्यार्थ्यांची यादी हाती आली असून त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर प्रियवंदा म्हाडदळकर आहे.

देशातून श्रुती शर्मा प्रथम, अंकिता अगरवाल द्वितीय तर गामिनी सिंगला हीने तृतीय क्रमांक पटकावला आहे. पहिल्या तीनही क्रमांकावर मुलींनी बाजी मारली असून देसभरातून त्यांचं कौतुक होत आहे. यावर्षी 685 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. या नियुक्तीमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थी देखील उत्तीर्ण झाले आहेत. महाराष्ट्रातील 47 उमेदवारांनी यूपीएससीच्या परीक्षेत यश मिळाले आहे.

Business Idea: नोकरी नसतानाही करोडपती व्हा; 5000 रुपये गुंतवा आणि घरी बसून महिन्याला 3 लाख रुपये कमवा

महाराष्ट्रातील या उमेदवारांनी मारली बाजी

1) प्रियंवदा म्हाद्दळकर (१३)

2) ओंकार पवार (१९४)

3) शुभम भोसले (१४९)

4) अक्षय वाखारे (२०३)

5) अमित लक्ष्मण शिंदे (५७०)

6) पूजा खेडकर (६७९)

7) अमोल आवटे (६७८)

8) आदित्य काकडे (१२९)

9) विनय कुमार गाडगे (१५१)

10) अर्जित महाजन (२०४)

11) तन्मय काळे (२३०)

12) अभिजित पाटील (२२६)

13) प्रतिक मंत्री (२५२)

14) वैभव काजळे (३२५)

15) अभिजित पठारे (३३३)

१६) ओमकार शिंदे (४३३)

१७) सागर काळे (२८०)

१८) देवराज पाटील (४६२)

१९) नीरज पाटील (५६०)

२०) आशिष पाटील (५६३)

२१) निखील पाटील (१३९)

२२) स्वप्नील पवार (४१८)

२३) अनिकेत कुलकर्णी (४९२)

२४) राहुल देशमुख (३४९)

२५) रोशन देशमुख (४५१)

२६) रोहन कदम (२९५)

२७ ) अक्षय महाडिक (२१२)

२८) शिल्पा खनीकर (५१२)

२९) रामेश्वर सब्बनवाड (२०२)

३०) शुभम नगराले (५६८)

३१) शुभम भैसारे (९७)

UPSC CSE प्राथमिक परीक्षा 10 ऑक्टोबर 2021 रोजी घेण्यात आली होती. परीक्षेचा निकाल 29 ऑक्टोबर रोजी जाहीर झाला होता. त्यानंतर मुख्य परीक्षा 7 ते 16 जानेवारी 2022 या कालावधीत घेण्यात आली होती. निकाल 17 मार्च 2022 रोजी जाहीर करण्यात आला. मुलाखत ही परीक्षेची शेवटची फेरी होती. जी 5 एप्रिल रोजी सुरु झाली आणि 26 मे रोजी संपली होती. आज या परीक्षांचा निकाल जाहीर झाला आहे.

पोरी मानलं तुला! 11वीच्या विद्यार्थिनीनं शेतात पाणी देण्यासाठी बनवली सोलर सायकल; पंपाविना करता येणार सिंचन

English Summary: UPSC Result 2022: Girls are the best in UPSC exams
Published on: 30 May 2022, 06:12 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)