Fieldking News :
देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी झटणारे आणि शेती तंत्र प्रगत करण्यास कटीबद्ध असणारे फील्डकिंग कंपनीने मल्टी रोटरी टिलरचे अनावरण केले आहे. शेतकऱ्यांसाठी आणि कंपनीसाठी हा एक आनंदाचा क्षण आहे.
फील्डकिंग कंपनीने मल्टी रोटरी टिलरचे चोपडा येथे अनावरण केले आहे. यावेळी १५० पेक्षा अधिक शेतकरी उपस्थित होते. यावेळी उपस्थित शेतकरी मिनी मल्टी रोटरी टिलरचे अनावरण पाहण्यास उत्सुक होते. पहिले एक युनिट शेतकरी श्री सोनू महाजन यांना अभिमानाने कंपनीने वितरीत केले आहे. जे थेट शेतकरी समुदायाला लाभ देण्याच्या कंपनीच्या समर्पणाचे प्रतीक आहे. मागील ४२ वर्षांपासून फील्डकिंगची प्रतिष्ठा कृषी क्षेत्राशी असलेल्या अथक वचनबद्धतेवर निर्माण झाली आहे.
या अनावरण कार्यक्रमासाठी श्री. घनशाम पाटील, सहकारी बँकेचे अध्यक्ष- चोपडा, श्री. सुनील जैन, पीपल्स बँकेचे उपाध्यक्ष- चोपडा, श्री. आशिषभाई गुजराथी- गोवर्धन फार्म प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष, श्री. दिपक साळुंखे - कृषी अधिकारी- कृषी विभाग जळगाव, श्री. नरेंद्र पाटील-कृषी बाजार विभागाचे अध्यक्ष- चोपडा आणि आदी मान्यवर उपस्थित होते.
१९७८ साली फिल्डकिंगची स्थापना
फील्डकिंगची १९७८ साली स्थापना झाली. बेरी उद्योग प्रा. लिमिटेड (BUPL) १.२ दशलक्षाहून अधिक शेतकर्यांशी खोलवर रुजलेले कनेक्शन बनवले आहे. आणि १०६ देशांमधील १४०० डीलरशिपमध्ये त्यांची उपस्थिती आहे. रोटरी टिलर्स (रोटाव्हेटर), डिस्क हॅरोज, डिस्क रिजर्स (बंड मेकर), टायने रिजर्स आणि इतर अनेक नवीन नवकल्पनांसह कंपनीची विस्तृत उत्पादन श्रेणी विविध कृषी गरजा पूर्ण करते. फील्डकिंगची उत्कृष्टतेची वचनबद्धता त्याच्या ISO 9001:2008 प्रमाणपत्राद्वारे ओळखली गेली आहे, जो जागतिक दर्जाच्या गुणवत्ता व्यवस्थापन पद्धतींचे पालन करण्याचा पुरावा आहे.
दरम्यान, मिनी मल्टी रोटरी टिलर लाँच करणे हे फील्डकिंगच्या शेतीला प्रगती करण्यासाठी आणि उत्पादकता आणि कार्यक्षमता वाढवणाऱ्या नाविन्यपूर्ण साधनांसह शेतकऱ्यांना सक्षम बनवण्याच्या अटल वचनबद्धतेचे प्रतीक आहे. फिल्डकींग शेतीतील एका नवीन युगाची सुरुवातच करत नाही तर शेतीचे भविष्य घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
कंपनीबाबतच्या अधिक माहितीसाठी www.fieldking.com या वेबसाईटवर तुम्ही अधिक माहिती पाहू शकता.
Published on: 31 August 2023, 11:32 IST