परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाने काही पिकांचे जरी नुकसान झाले असले तरी या पावसाने मात्र कोरडवाहू क्षेत्रातील रब्बी ज्वारीला चांगलेच जिवदान मिळाल्याचे चित्र खुललेल्या ज्वारी पिकावरुन दिसत आहे. सुरुवातीला पावसाने आणि गारपीटीमूळे काही ठिकाणी आडवी झालेली ज्वारी आता उभी राहील्याचे दिसत आहे.
मागिल काही दिवसांपासून राज्यातील अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ज्वारी, कांदा, मका, द्राक्षबागा यांसह इतर हाताशी आलेली पिके पावसामुळे वाया गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. मात्र परभणी जिल्ह्यातील काही भागांमध्ये आडवी झालेल्या ज्वारीला सततच्या पावसामुळे पाण्याचा पुरवठा चांगला झाल्याने ज्वारीचे पीक परत उभे राहिल्याचे पाहायला मिळत आहे.
राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमधील पिके जमीनदोस्त झाली आहेत. मागील हंगामात पुरेसा पाऊल न झाल्याने दुष्काळसदृश्य परीस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे मागील हंगामात जास्त पिक आलं नाही. आणि आता रब्बी हंगामात चांगल्या उत्पनाची अपेक्षा असताना या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने आहे. मात्र अवकाळी पावसामुळे कोरडवाहू क्षेत्रातील रब्बी ज्वारीचे पिक चांगले खुलले आहे. सुरुवातीला पावसाने आणि गारपीटीमूळे काही ठिकाणी आडवी झालेली ज्वारी आता उभी राहील्याचे दिसत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
Published on: 04 December 2023, 02:45 IST