सध्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतीतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशा परिस्थितीत राज्यात पुन्हा एकदा पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान तज्ञ पंजाबराव डख (Punjabrao Dakh) यांच्याकडून वर्तवण्यात आली आहे. यामुळे यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
आता 18 एप्रिलपासून पुन्हा एकदा अवकाळी पावसाला सुरुवात आहे. पंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार (Punjabrao Dakh Weather Update), राज्यामध्ये 18 एप्रिलपासून पुन्हा एकदा अवकाळी पावसाला सुरुवात होणार आहे. राज्यात 18, 19 आणि 20 एप्रिल 2023 रोजी बहुतांश ठिकाणी अवकाळी पाऊस हजेरी लावणार असल्याची शक्यता त्यांच्याकडून वर्तवण्यात आली आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमालाची योग्य ती काळजी घ्यावी, अशा सूचना देखील हवामान विभागाकडून देण्यात आल्या आहे. तसेच मे महिन्यात देखील पावसाची शक्यता आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून अवकाळी पावसाने राज्यात थैमान (Weather Update) घातले आहे. तर, मे महिन्यात देखील राज्यात पावसाची शक्यता आहे.
पिवळ्या कलिंगडाला मोठी मागणी! शेतकरी होतोय मालामाल...
15 मे नंतर राज्यात अवकाळी पाऊस पडणार असल्याची शक्यता पंजाबराव डख यांच्याकडून वर्तवण्यात आली आहे. म्हणजे जवळपास संपूर्ण उन्हाळा अवकाळी पाऊस पडणार असल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या आठवड्यामध्ये राज्यातील बहुतांश भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी (Weather Update) लावली होती.
शेतकरी मुलांच्या लग्नासाठी आता स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, मुलीला 10 लाख देण्याची मागणी...
यामुळे शेतीतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. विशेषत: पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पावसामुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशात हवामान खात्याकडून पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
शेतकऱ्यांनो शेतीच्या अवजारांची अशा प्रकारे राख निगा आणि देखभाल..
शेतकऱ्यांनो आता जमीन मोजणी झाली अचूक आणि गतिमान, जाणून घ्या..
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात मृत्यूचा आकडा 11 वर, उन्हात कार्यक्रम घेतल्याने होतेय टीका
Published on: 17 April 2023, 12:18 IST