News

चिखली तालुक्यातील तेल्हारा ग्रामसेवा सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाची अविरोध निवडणूक पार पडल्यानंतर

Updated on 26 February, 2022 11:48 AM IST

चिखली तालुक्यातील तेल्हारा ग्रामसेवा सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाची अविरोध निवडणूक पार पडल्यानंतर नवनियुक्त संचालकामधुन अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी दिनांक 19 फेब्रुवारी 2022 रोजी संस्थेच्या कार्यालयात संचालक मंडळाच्या बोलावलेल्या सभेमध्ये अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडणुक घेण्यात आली यामध्ये अध्यक्षपदी शंकर मच्छिंद्र गोवर्धन तर उपाध्यक्षपदी विनायक रामभाऊ सरनाईक यांची अविरोध निवड करण्यात आली.

विनायक सरनाईक हे मागील 12 ते 15 वर्षांपासून शेतकरी चळवळीत कार्य करीत असून तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या कधी संवादाच्या तर कधी आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी सोडवल्या आहेत. सरनाईक हे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेत खा राजु शेट्टी व माजी वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष तथा प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कायम अग्रेसर असतात.

शेतकरी चळवळीचे सक्रीय कार्यकर्ते म्हणून त्यांची तालुक्यातच नव्हे तर जिल्हाभर ओळख आहे. सरनाईक यांच्या निवडीमुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.आपल्या पदाला न्याय देण्याची भूमिका व शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण कायमच कटिबद्ध राहू असा विश्वास निवडीनंतर सरनाईक यांनी व्यक्त केला या निवडीनंतर संचालक मंडळाकडुन पेढा भरवत त्यांचा सत्कार देखील करण्यात आला आहे.यावेळी तेल्हारा ग्रामसेवा सहकारी संस्था संचालक व ग्रामस्थ उपस्थीत होते.

चिखली तालुक्यातील तेल्हारा ग्रामसेवा सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाची अविरोध निवडणूक पार पडल्यानंतर नवनियुक्त संचालकामधुन अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी दिनांक 19 फेब्रुवारी 2022 रोजी संस्थेच्या कार्यालयात संचालक मंडळाच्या बोलावलेल्या सभेमध्ये अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडणुक घेण्यात आली यामध्ये अध्यक्षपदी शंकर मच्छिंद्र गोवर्धन तर उपाध्यक्षपदी विनायक रामभाऊ सरनाईक यांची अविरोध निवड करण्यात आली. 

प्रतिनिधी - गोपाल उगले

English Summary: Unopposed election of Vinayak Saranaik as Vice President of Telhara Gramseva Sahakari Society
Published on: 26 February 2022, 11:46 IST