News

अनेक ठिकाणी नवीन वर्षांचे स्वागत हे मोठ्या धुमधडाक्यात करण्यात आले. दारू मटण तसेच अनेक वेगवेगळे बेत आखण्यात आले. असे असताना जळगावमधील रतनलाल बाफना गोसेवा अनुसंधान केंद्रामध्ये (Jalgaon Ratanlal Bafna) गोमूत्र प्राशनाच्या अनोख्या पार्टीचे आयोजन करण्यात आले.

Updated on 02 January, 2023 11:21 AM IST

अनेक ठिकाणी नवीन वर्षांचे स्वागत हे मोठ्या धुमधडाक्यात करण्यात आले. दारू मटण तसेच अनेक वेगवेगळे बेत आखण्यात आले. असे असताना जळगावमधील रतनलाल बाफना गोसेवा अनुसंधान केंद्रामध्ये (Jalgaon Ratanlal Bafna) गोमूत्र प्राशनाच्या अनोख्या पार्टीचे आयोजन करण्यात आले.

दारू पार्टीचे दुष्परिणाम टाळण्यासाठी जळगाव मधील बाफना गोसेवा अनुसंधान केंद्रातील गोभक्त दर वर्षी गोमूत्र पिऊन अनोख्या पद्धतीने नववर्षाचे स्वागत करत असल्याचे पाहायला मिळत असतं. यंदाही मोठ्या उत्साहाने या गोभक्तांनी या गोमूत्र पार्टीचा आनंद घेतला असल्याचं पाहायला मिळाले आहे.

गोमूत्र पिण्याने दारू पिण्याची इच्छा होत नसल्याने दारू मटणापासून दूर राहण्याचा हा उत्तम पर्याय असल्याचं देखील आयोजकांचं मत आहे. या पार्टीच्या निमित्ताने आम्ही सर्व गो भक्त आपल्या कुटुंबासह एकत्र येऊन हा उपक्रम राबवत असतो. त्यामुळे कुटुंबासोबत असल्याने एक वेगळा आनंद ही आम्हाला मिळत असतो.

नवीन वर्षांत शेतकऱ्यांना बसणार महागाईची झळ! खतांच्या किमती 40 टक्क्यानी वाढल्या

नाहीतर दारू पिणारे कुटुंबाला सोडून एकटेच दारू प्यायला जात असतात. रस्त्यावर लोळतात, त्यापेक्षा तर गोमूत्र पिणे हे कधीही चांगले असल्याचा आमचा अनुभव आहे, असे काहींनी सांगितले. यामुळे याची राज्यात चांगलीच चर्चा आहे.

उजनीत हिरवे विष! पशुधन धोक्यात

गोमूत्र नियमित प्यायल्याने आरोग्य उत्तम राहते आणि आयुष्य वाढते. अनेकजण या निमित्ताने सुरुवात करून नंतर मद्याच्या आहारी गेल्याचंही पाहायला मिळतं, असेही अनेकांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या;
कोरोना जवळ आला असताना डॉक्टर संपावर, आरोग्य यंत्रणा कोलमडण्याची शक्यता
फुले ११०८२! ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर जात...
नॅनो-डीएपीला दोन दिवसांत मान्यता मिळणार, नेहमीच्या खताच्या तुलनेत निम्म्या भावात उपलब्ध होणार..

English Summary: unique party of Cow Urine Prashana New Year in Jalgaon alcohol
Published on: 02 January 2023, 11:21 IST