News

सध्या देशात समान नागरी कायदा अस्तित्वात आणण्यासाठी हालचाली सुरू असल्याचे सांगितले जात आहे. आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठे वक्तव्य केले आहे. याची चर्चा सध्या सुरू आहे.

Updated on 30 June, 2023 11:04 AM IST

सध्या देशात समान नागरी कायदा अस्तित्वात आणण्यासाठी हालचाली सुरू असल्याचे सांगितले जात आहे. आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठे वक्तव्य केले आहे. याची चर्चा सध्या सुरू आहे.

रामदास आठवले म्हणाले, देशामध्ये समान नागरी कायदा झाला पाहिजे, ही सगळ्यांची भावना आहे. हा कायदा मुस्लिमांच्या विरोधात नाही. मात्र, त्याचा काहींनी बागुलबुवा उभा केला आहे. ते चुकीचे आहे.

सरकारने आता हरकती मागविलेल्या आहेत. हा देश एकसमान राहावा, इथे सर्व जण गुण्यागोविंदाने नांदावेत, हीच एक भावना आहे. त्यामुळे येणाऱ्या २०२४ च्या निवडणुकीच्या आधीच हा कायदा लागू होण्याची शक्यता असल्याचे आठवले यांनी म्हटले आहे.

मका लागवड, संपूर्ण माहिती जाणून घ्या

तसेच ते म्हणाले, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. आर. राव यांचा भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्ष राज्यात आला आहे. मात्र त्याचा कोणताही परिणाम एनडीएवर होणार नाही.

तेलंगणाचे मुख्यमंत्री राव यांच्या पक्षाकडे पैसा आहे म्हणूनच ते त्याचा वापर करत आहेत. मात्र, त्याचा कोणताही परिणाम राज्यात होणार नाही. आम्ही जर त्यांच्या राज्यात गेलो व बॅनर लावले तर काय होईल, असा सवाल आठवले यांनी यावेळी उपस्थित केला.

परभणी-असोला येथील जावळे बंधूंची यशस्वी खजूर शेती! पंधरा एकरातील खजूर फळ विक्रीतून कमावताहेत लाखो रुपये..

राव यांचा पक्ष ही भाजपची बी टीम नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. आठवले हे नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

पंजाबचे पशुपालक स्वच्छ व निर्भळ दूध उत्पादनासाठी काय करतात? जाणून घ्या..
मत्स्य उत्पादनात भारताचा जगात तिसरा क्रमांक
"FRP मध्ये केलेली वाढ म्हणजे डोंगर पोखरुन हाती लागलेली उंदराची पिल्ली"

English Summary: Union Minister's statement likely to implement Uniform Civil Code
Published on: 30 June 2023, 11:04 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)