कृषी जागरणच्या मिलियनेअर फार्मर ऑफ इंडिया अवाॅर्ड 2023 प्रायोजक महिंद्रा ट्रॅक्टर्स कार्यक्रमाचे उद्घाटन आज दि.6 डिसेंबर रोजी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. यासोबतच त्यांनी 'MFOI' ने सुरू केलेल्या किसान भारत यात्रेला देखील हिरवा कंदील दाखवला आहे. त्यानुसार किसान भारत यात्रेला सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमासाठी देशातील शेतीतून लखपती झालेले आणि शेतीत नाविन्यपूर्ण काम केलेले शेतकरी उपस्थित आहेत. शेतकऱ्यांच्या अतुलणीय योगदानाची ओळख करून देण्यासाठी आणि कृषी समुदायाने बजावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेची कबुली देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते शेतकऱ्यांचा सम्मान करण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
आज पासून सुरू होणारा हा सन्मान सोहळा ८ डिसेंबर 2023 पर्यंत असणार आहे. तीन दिवसाचा हा सोहळा नवी दिल्लीतील आयआरएआयच्या पुसा मैदानावर आयोजित करण्यात आलेला आहे. या सोहळ्यात कृषी कंपनी, व्यावसायिक, शेतकरी यांच्यासाठी खास विविध सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे.
काय म्हणाले नितीन गडकरी -
उत्पादनाने उत्पादन आणि खर्चाच्या किमतीत मार्जिन बनले पाहिजे. त्याचबरोबर पाण्याचे नियोजन ही करणे तितकेच गरजेचे आहे. चांगले बियाणे तयार करा त्याबरोबरच स्वतःची रोपवाटिका बनवून त्यातून यशस्वी होण्याचा प्रयत्न करा. नवीन टेक नवनवीन टेक्नॉलॉजीचा वापर वाढवून उत्पादन खर्च कमी करा. तसेच बांबू लागवड करा असे आवाहनही नितीन गडकरींनी शेतकऱ्यांना केले.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे कोण असणार -
या कार्यक्रमासाठी आचार्य देवव्रत-गुजरातचे राज्यपाल, नितीन गडकरी - रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री, परषोत्तम रूपाला- मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री, साध्वी निरंजन ज्योती - ग्रामीण विकास मंत्री, पी.सथसिवम - भारताचे सरन्यायाधीश आणि केरळचे राज्यपाल, प्रताप सारंगी- लोकसभा सदस्य ओडीशा, महेंद्रसिंग सोळंकी - लोकसभा सदस्य - कृषी संसदीय स्थायी समिती, पोचा ब्रम्हानंदा - लोकसभा सदस्य - कृषी संसदीय स्थायी समिती - आंध्रप्रदेश, शंकर लालवानी - लोकसभा सदस्य -इंदोर हे मान्यवर उपस्थित असणार आहेत.
MFOI कार्यक्रमात कोणत्या कंपन्या सहभागी?
दिल्लीत शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा पार पडत आहेत. शेतकऱ्यांसाठी याठिकाणी प्रदर्शनाचे आयोजन देखील करण्यात आले आहे. यात कोरोमंडल फ्यूचर पॉझिटिव्ह, एफएमसी कॉर्पोरेशन केमिकल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, होंडा, सोमानी सीड्स, नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह्ज एक्सचेंज लिमिटेड (एनसीडीईएक्स), आणि एजीएमए प्रायव्हेट लि. याशिवाय नॉलेज पार्टनर MANAGE, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार आणि डिजिटल पार्टनर डेलीहन्ड देखील उपस्थित आहेत.
भारत सर्टिस ऍग्रिसायन्स लि., देहात, जेनक्रेस्ट, गोकुळ ऍग्री इंटरनॅशनल लि., महिंद्रा फायनान्स, पीआय इंडस्ट्रीज, सैनी, स्टिहल, विलोवुड, एडीएस ऍग्रो टेक प्रायव्हेट लिमिटेड, अमूल, एयू स्मॉल फायनान्स बँक, भोलानाथ, कृषी प्रार्थना. एलोरा, डॉ. गोयल, ग्रोव्हीटी, आयएसएबी, बारामती एॅग्रो इत्यादी कंपन्यांना याठिकाणी सहभागी झाल्या आहेत.
या कार्यक्रमात देशभरातील ७५० कृषी विज्ञान केंद्र (KVK) सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर केव्हीके अंतर्गत येणारे शेतकऱ्यांची संख्या ७५० पेक्षा जास्त असणार आहे. तसंच थेट शेतकऱ्यांची संवाद साधल्यामुळे अर्थातच नॉन केव्हीके अंतर्गत येणारे शेतकरी देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित असणार आहेत.
पुरस्कार कसे असणार -
शेतकरी - ७८७
बिलिनीयर - ५० पेक्षा जास्त
मिलिनीयर - ६०० पेक्षा जास्त
राज्य - ६० पेक्षा जास्त
MFOI किसान भारत यात्रा -
MFOI किसान भारत यात्रेचे उद्दिष्ट डिसेंबर २०२३ ते नोव्हेंबर २०२४ पर्यंत देशातील जास्तीत जास्त अंतर पार करून, १ लाख पेक्षा जास्त शेतकर्यांपर्यंत पोहचणे हे आहे. तसेच ४ हजार पेक्षा जास्त ठिकाणांना भेट दिली जाणार आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे ही यात्रा २६ हजार किलोमीटर पेक्षा जास्त अंतर पार करणार आहे.या यात्रेचे प्राथमिक उद्दिष्ट शेतकर्यांची सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमी वाढवून त्यांना सक्षम करणे आहे. त्याचबरोबर कृषी समुदायांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या वचनबद्धतेला नवीन स्वरूप देणे हे आहे.
"प्रत्येक शेतकरी करोडपती होण्याची आकांक्षा बाळगतो आणि ज्यांनी ही कामगिरी केली त्यांचा सन्मान केला पाहिजे. लोकांचा शेतकरी आणि शेतीबद्दलचा विचार बदलणे हा त्यांचा उद्देश आहे. ते स्वतः शेतकरी कुटुंबातून आलेले आहेत. त्यांचे वडीलही शेतकरी होते आणि त्यांनी वयाच्या १४ व्या वर्षापर्यंत शेतीही केली होती.जेव्हा जेव्हा त्यांनी शेती सोडून इतर क्षेत्रांकडे पाहिले तेव्हा कोणी ना कोणी रोल मॉडेल म्हणून सादर केले. पण, कृषी क्षेत्रात ना कुठला रोल मॉडेल आहे ना तो मोठ्या प्रमाणावर मांडला जात आहे. हे लक्षात घेऊन हा उपक्रम सुरू करण्याचा विचार त्यांच्या मनात आला. मी वर्षापूर्वी पाहिलेल्या स्वप्नाला ‘MFOI पुरस्कार’ असे नाव देण्यात आले आहे. कृषी जागरण भविष्यात शेतकऱ्यांसाठी इतरही अनेक पुरस्कार शो आयोजित करेल."
एम.सी.डोमॅनिक, कृषी जागरण संस्थापक आणि मुख्य संपादक
“गेल्या काही दशकांमध्ये कृषी क्षेत्रातील महिलांची भूमिका झपाट्याने वाढली आहे. महिला शेतकऱ्यांनी या क्षेत्रात प्रत्येक पावलावर आपले योगदान दिले आहे, तरीही महिला या क्षेत्रात आपल्या अस्तित्वासाठी झगडत आहेत. मला आशा आहे की, 'द मिलियनेअर फार्मर ऑफ इंडिया अवॉर्ड-2023' मध्ये त्या महिला शेतकऱ्यांना पुरस्कृत केल्याने ज्यांनी कृषी क्षेत्रात स्वावलंबी बनून चांगली कामगिरी केली आहे, महिला शेतकऱ्यांबद्दलची मानसिकता बदलेल. तसेच हा पुरस्कार सोहळा यशस्वी करण्यासाठी तुम्हा सर्व शेतकऱ्यांना आमंत्रित करण्यात येत आहे.”
शायनी डॉमिनिक, व्यवस्थापकीय संचालक – कृषी जागरण
Published on: 06 December 2023, 08:20 IST