News

Union Budget 2023 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत आर्थसंकल्प सादर केला. भारताच्या अर्थव्यस्थेला चांगली गती मिळून अर्थव्यवस्था वृद्धिंगत होईल अशी आशा यावेळी अर्थमंत्र्यांनी व्यक्त केली.

Updated on 01 February, 2023 11:49 AM IST

Union Budget 2023 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत आर्थसंकल्प सादर केला. भारताच्या अर्थव्यस्थेला चांगली गती मिळून अर्थव्यवस्था वृद्धिंगत होईल अशी आशा यावेळी अर्थमंत्र्यांनी व्यक्त केली.

अर्थमंत्र्यांनी मांडलेले मुद्दे आणि घोषणा

  • भारत ही जगातील पाचवी मोठी आर्थव्यवस्था
  • गरिबांना २०२४ पर्यंत मोफत धान्य मिळणार त्यासाठी २ लाख कोटींची तरतूद
  • भारताने १०२ कोटी जनतेचं मोफत लसीकरण केलं
  • लडाख, ईशान्य भारतावर विशेष लक्ष
  • भारत हा उज्ज्वल भविष्याच्या मार्गावर
  • जी २० चं अध्यक्षपद मिळणं भारतासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
  • यूपीआय आणि कोविन अॅपमुळे जगाने भारताचं महत्त्व मान्य केलं.
  • सर्वांगीण विकासाचं स्वप्न पूर्ण होताना दिसत आहे.
  • मोठ्या मंदीतही भारताची यशस्वी वाटचाल, मोठ्या देशांनी भारताचं कौतुक केलं, भारताचं कर्तृत्व उजळून निघालं.
  • शेतकऱ्यांना थेट खात्यामध्ये रक्कम देण्याची योजना यशस्वी झाली
  • नव्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली. सर्वांगीण विकासाचं स्वप्न पूर्ण केलं

'या' जिल्ह्यातील दुष्काळी भागाला कायमस्वरूपी पाणी देणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शेतकऱ्यांसाठी केलेल्या घोषणा


  • ग्रीन ग्रोथ च्या माध्यमातून रोजगार निर्मीती करणार
  • पर्यटनाला चालना देण्यासाठी पावलं उचलणार
  • शेतकऱ्यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म बनवणार, शेतकऱ्यांना ट्रेनिंग दिलं जाणार
  • कापसापासून सर्वांत जास्त नफा मिळवण्यासाठी प्रयत्न करणार
  • डाळींसाठी विशेष हब तयार केलं जाणार
  • कृषीसंदर्भातील स्टार्टअपना चालना देणार
  • पर्यावरण संवर्धनाकडे विशेष लक्ष दिलं जाणार
  • पीएम विश्वकर्मा योजनेची घोषणा
  • सहकार मॉडेलला येत्या काळात प्राधान्य
  • मत्स विकासासाठी ६ हजार कोटींची तरतूद
  • हैदराबादच्या श्रीअन्न रिसर्च सेंटरसाठी विशेष अनुदान जाहीर
  • अन्न साठवण विकेंद्रीकरण योजना राबवणार
  • कृषीपुरक स्टार्टअपना पाठबळ
  • छोट्या सहकारी संस्थांच्या निर्मितीला प्राधान्य

शेतकरी हितासाठी शेतात आणि बाजारातही शेतकरीच पाहिजे

English Summary: Union Budget 2023 : Finance Minister's big announcements for farmers
Published on: 01 February 2023, 11:48 IST