1. बातम्या

वर्ष 2019-20 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर

नवी दिल्ली: वर्ष 2019-20 साठी मांडण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात 2022 पर्यंत देशाच्या ग्रामीण भागातील प्रत्येकाला घर देणे आणि प्रत्येक घरात वीजपुरवठा देण्याची योजना आखण्यात आली आहे. वर्ष 2022 पर्यंत शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करणे, ‘जल जीवन योजनें’तर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे आणि ‘प्रधानमंत्री कर्मयोगी मानधन योजनेंतर्गत’ 3 कोटी छोट्या दुकानदारांना निवृत्तीवेतन देण्याची योजना आहे.

KJ Staff
KJ Staff


नवी दिल्ली:
वर्ष 2019-20 साठी मांडण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात 2022 पर्यंत देशाच्या ग्रामीण भागातील प्रत्येकाला घर देणे आणि प्रत्येक घरात वीजपुरवठा देण्याची योजना आखण्यात आली आहे. वर्ष 2022 पर्यंत शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करणे, ‘जल जीवन योजनें’तर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे आणि ‘प्रधानमंत्री कर्मयोगी मानधन योजनेंतर्गत’ 3 कोटी छोट्या दुकानदारांना निवृत्तीवेतन देण्याची योजना आहे. देशाच्या पूर्णवेळ पहिल्या महिला अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत वर्ष 2019-20 साठी 27 लाख 86 हजार 349 कोटींचा अर्थसंकल्प मांडला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य आणि लोकसभेचे सदस्य यावेळी सदनात उपस्थित होते.              

पंतप्रधान आवास योजनेतंर्गत 1 कोटी 95 लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत आतापर्यंत देशातील दिड कोटी घरे बांधण्यात आली आहेत. या योजनेंतर्गत वर्ष 2022 पर्यंत 1 कोटी 95 लाख घरे बांधण्याची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. 

‘जलजीवन’ योजनेंतर्गत ग्रामीण भागात पिण्याचे पाणी

पिण्याच्या पाण्यावर तोडगा काढण्यासाठी केंद्र शासनाने जलशक्ती मंत्रालयाची स्थापना केली आहे. या मंत्रालयाच्या वतीने ‘जलजीवन’ ही योजना आखण्यात आली असून या माध्यमातून देशातील 1 हजार 592 ब्लॉक मध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे. योजनेच्या अंमलबजावणीतून 2024 पर्यंत चिन्हित ग्रामीण भागामध्ये प्रत्येकाला पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उज्ज्वला आणि सौभाग्य या योजनांमुळे ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाचे जीवन आमूलाग्र बदलले असून, त्यांची जीवन सुलभ झाले आहे. 2022 पर्यंत सर्व ग्रामीण इच्छुक कुटुंबांना विद्युत पुरवठा आणि स्वच्छ स्वयंपाक बनवण्याच्या सोयी पुरविणार  

शेतकरी कल्याणासाठी महत्वपूर्ण योजना

वर्ष 2022 पर्यंत देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे केंद्र शासनाचे उद्दिष्ट असून यासाठी विविध योजना आखण्यात आल्या आहेत. शेतीपूरक  मत्स्य व्यवसायविकासासाठी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत मत्स्योद्योग विभाग, मत्स्योद्योग व्यवस्थापनासाठी एक मजबूत आराखडा उभा करणार आहे. याद्वारे पायाभूत सोयी, आधुनिकीकरण, उत्पादन व उत्पादकता वाढवणे आणि गुणवत्ता नियंत्रण यासारख्या मूल्य साखळीतील कमतरता भरुन काढण्याचा प्रयत्न केला जाणार असून वर्ष 2019-20 मध्ये 100 नवीन क्लस्टर उभारण्यात येणार आहे.

घर खरेदी सूट तर गृह कर्जावरील व्याजदरातही सूट

45 लाखांपर्यंतचे घर खरेदी करणाऱ्या लोकांना दीड लाख रुपयांची सूट देण्यात येणार. तसेच गृह कर्जावरील व्याजदरात मिळणारी सूट 2 लाखांहून 3.5 लाखांपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्याचसोबत इलेक्ट्रीक कार खरेदी करणाऱ्यांनाही करात विशेष सूट देण्यात आली आहे. 

अनिवासी भारतीयांना (एनआरआय) 180 दिवसांत आधार कार्ड देणार

ज्या एनआरआयकडे भारतीय पासपोर्ट आहे, त्यांना भारतात येताच आधार कार्ड दिले जाईल. 180 दिवसांसाठी थांबावे लागतं असा नियम आहे, पण आता त्याची गरज राहणार नाही.

स्वच्छ भारत अभियानाची व्याप्ती वाढणार

‘स्वच्छ भारत अंतर्गत’ 9 कोटी 6 लाख शौचालय मागील पाच वर्षात बांधण्यात आली. जवळपास 5 लाख 6 हजार गावे हागणदारीमुक्त झाली आहेत. स्वच्छ भारत अभियानाची व्याप्ती वाढविण्यासाठी सॉलिड वेस्ट मॅनजमेंट प्रत्येक गावांमध्ये राबविण्यात येणार आहे.

35 कोटी एलईडी बल्ब वितरित करणार

प्रत्येक घरात वीज देण्यासाठी उजाला योजनेंतर्गत 35 कोटी एलईडी बल्ब वितरित करण्यात येतील. वर्षाला एलईडी बल्बमुळे 18 हजार 340 कोटी रुपयांची बचत होत आहे. 

पंतप्रधान कर्मयोगी मानधन योजना जाहीर; छोट्या व्यापाऱ्यांना निवृत्ती वेतन

किरकोळ व्यापारी व छोट्या दुकानदारांसाठी प्रधानमंत्री कर्मयोगी मानधन ही निवृत्तीवेतन योजना तयार करण्यात आली आहे. वार्षिक उलाढाल दीड कोटींच्या आत असणाऱ्या देशातील तीन कोटी किरकोळ व्यापारी व लहान दुकानदारांना याचा फायदा होणार आहे.

अर्थसंकल्पात प्रमुख विषयांवर होणारा खर्च

  • निवृत्ती वेतन: 1 लाख 74 हजार 300 कोटी
  • संरक्षण: 3 लाख, 5 हजार 296 कोटी
  • अनुदानखते (79 हजार 996 कोटी), अन्न (1 लाख 84 हजार 220 कोटी), पेट्रोलियम (37 हजार 478 कोटी)
  • कृषी व कृषी पूरक योजना: (1 लाख 51 हजार 518 कोटी)
  • उद्योग व वाणिज्य: 27 हजार 43 कोटी
  • शिक्षण: 94 हजार 854 कोटी
  • ऊर्जा: 44 हजार 438 कोटी
  • ग्रामीण विका: 1 लाख 40 हजार 762 कोटी
  • शहरी विकास: 48 हजार 32 कोटी
  • सामाजिक कल्याण: 50 हजार 850 कोटी
  • दळणवळण: 1 लाख 57 हजार 437 कोटी
  • वित्त: 20 हजार 121 कोटी
  • आरोग्य: 64 हजार 999 कोटी
  • गृह खाते: 1 लाख 3 हजार 927 कोटी
  • माहिती व तंत्रज्ञानदूरसंचार: 21 हजार 783 कोटी
  • व्याजापोटी: 6 लाख 60 हजार 471 कोटी
  • योजना व सांख्यिकी: 5 हजार 814

असा येणार रुपया....

  • 20 पैसे. उधार परतावा
  • 21 पैसे. नगर पालिका/परिषद कर 
  • 16 पैसे. आयकर
  • 4 पैसे. सीमा शुल्क
  • 8 पैसे. केंद्रीय उत्पादन शुल्क
  • 19 पैसे. वस्तू व सेवा कर (जीएसटी)
  • 9 पैसे. अन्‍य महसूल कर्ज व अन्य भांडवली मिळकत         

असा जाणार रूपया....

  • 9 पैसे. केंद्र प्रायोजित योजना  
  • 13 पैसे. केंद्र शासनाच्या योजना
  • 18 पैसे. व्याजाचा परतावा
  • 9 पैसे. संरक्षण
  • 8 पैसे. अनुदान
  • 7 पैसे. वित्त आयोग व अन्य अंतरण
  • 23 पैसे. कर व शुल्कांमध्ये राज्यांचा हिस्सा
  • 5 पैसे. निवृत्ती वेतन 
  • 8 पैसे. अन्य खर्च                          

वित्तीय तूट

केंद्रीय अर्थसंकल्प 15 लाख 9 हजार 754 कोटी वित्तीय तुटीचा असून ही तूट खालीलप्रमाणे आहे.

  • आर्थिक तूट: 7 लाख 3 हजार 760 कोटी
  • महसूल तूट4 लाख 85 हजार 19 कोटी
  • प्रभाव पाडणारी तूट: 2 लाख 77 हजार 686
  • प्राथमिक तूट: 43 हजार 289 कोटी   

 

English Summary: Union Budget 2019-20 Published on: 06 July 2019, 07:51 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters