दिल्ली
प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत विंड पोर्टलचे उद्घाटन करताना केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी एक महत्वाची घोषणा केली आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांचा पिकविमा खात्यावर जमा होणार आहे. या योजनेअंतर्गत ५६ लाख ६० हजार शेतकऱ्यांना यांचा लाभ होणार आहे.
तसंच राज्य सरकारकडून मिळणारे प्रिमियम अनुदान भरले जात नव्हते. त्यामुळे अनेक शेतकरी यापासून वंचित राहत होते. त्यामुळे केंद्र सरकारने आज (दि.२१) ५६ लाख ६० हजार शेतकऱ्यांच्या पिकविम्याला हिरवा कंदिल दिला आहे. त्यामुळे २५८ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत.
दरम्यान, प्रधानमंत्री पीक विमा योजना ही शेतकऱ्यांच्या हितासाठी चालवली जाणारी योजना आहे. या अंतर्गत कोणत्याही प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाले असेल तर शेतकऱ्यांना या योजनेतंर्गत नुकसान भरपाई दिली जाते.
Published on: 21 July 2023, 05:07 IST