सध्याच्या युगात फुलशेतीचे क्षेत्र वाढत तरी आहे मात्र त्याप्रमाणे उत्पादन भेटत नाही. फुलशेती करणे म्हणजे केवळ छंद यासाठी करतात मात्र काळाच्या ओघात ग्राहकांची मागणी पाहता तसेच बाजारपेठेतील सूत्र बदलत आहेत. फुलशेतीच्या माध्यमातून उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितले आहे. पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फ्लॉवर रिसर्चमध्ये एक पायाभूत सुविधा म्हणून मंगळवारी त्यांच्या हस्ते प्रयोगशाळेचे उदघाटन करण्यात आले. देशात प्रत्येक सण असो किंवा कोणताही धार्मिक सामाजिक कार्यक्रम असो त्यासाठी अजून फुलांची आवश्यकता आहे.
केंद्र सराकारकडून फुलशेतीला प्रोत्साहन :-
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी क्षेत्राचा विकास व्हावा म्हणून अनेक योजना आखलेल्या आहेत त्याचा फायदाही शेतकऱ्यांना होत आहे. जास्त परिश्रम करून उत्पादनात वाढ होते असे नाही तर त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची सुद्धा गरज लागते. युवा पिढीसाठी सुद्धा फुलशेती हा चांगला पर्याय आहे. यासाठी आपल्याला नियोजनबद्ध काम करणे आवश्यक आहे.
फुलांचा सुगंध कमी करू नका, संशोधन शास्त्रज्ञांचे मत :-
नवनवीन संशोधन करून शेती क्षेत्राचा चांगल्या प्रमाणात विकास साधलेला आहे जे की नवीन नवीन तंत्रज्ञाने आली असून शेतकरी नवीन नवीन प्रयोगही करत आहेत. कार्यक्रमाच्या दरम्यान संशोधकांनी सांगितले की फुलांच्या सुगंधात कमीपणा येऊ देऊ नका तसेच नवीन वाण लावणे गरजेचे आहे. भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवून आणण्याचे काम फुले करतात त्यामुळे तुम्ही याची काळजी घेणे आवश्यक आहे.
नवीन वाण शेतकऱ्यांच्या बांधावर जाणे गरजेचे :-
प्रयोगशाळामध्ये नवीन नवीन फुलांच्या वाणांचे संशोधन केले जाते मात्र त्या तुलनेत पाहायला गेले तर याचा वापर होत नाही. संशोधनावेळी मोठा गाजावाजा होतो मात्र ज्यावेळी येते त्यावेळी वानाकडे लक्ष दिले जात नाही. जरी नवीन वाणांचे संशोधन झाले तर ते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाईल अशी मागणी ठरत आहेत. नवीन वाणांचे संशोधन करणे ही एक अभिमानाची गोष्ट आहे मात्र त्याचे चीज झाले पाहिजे असे राज्यमंत्री कैलास चौधरी यांचे मत आहे. कार्यक्रम दरम्यान आयसीएआरचे महासंचालक डॉ. त्रिलोचन महापात्रा तसेच उपमहासंचालक डॉ. के.व्ही. प्रसाद व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फ्लॉवर रिसर्च अँड हॉर्टिकल्चर फार्मर्सचे संचालक डॉ. के. व्ही. प्रसाद उपस्थित होते.
Published on: 05 January 2022, 04:08 IST