गेल्या काही दिवसांपासून देशात समान नागरी कायद्याबाबत चर्चा सुरु आहे. यामुळे तो कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असताना आता महाराष्ट्रात (Maharashtra) समान नागरी कायदा लागू होईल असे संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) दिलेत. देशात समान नागरी कायदा लागू करण्याची मागणी आता जोर धरू लागलीय.
असे असताना मात्र देशात हा कायदा लागू करण्यापूर्वी राज्यातच आधी लागू होणार असल्याचे संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. संविधानाने प्रत्येक राज्यात समान नागरी कायद्याचे अधिकार दिले आहेत. त्यामुळे हळूहळू सगळेच कायदा लागू करतील असं मला वाटतं”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
विवाह आणि संपत्तीसाठी सर्वधर्मीयांसाठी एकच नियम. एकीकडे राज्यात हा कायदा लागू होईल असे संकेत मिळतायत तर या कायद्याला अनेक स्तरातून विरोध होतोय, आता पुढे काय होणार हे लवकरच समजेल. समान नागरी कायदा गोव्यात आहे, आता उत्तराखंड लागू करत आहे. हिमाचल प्रदेश, गुजरात हे राज्यही समान नागरी कायदा लागू करणार आहेत.
हे शेततळे बांधण्यासाठी 2 वर्ष लागली असून 22 लाख रुपये खर्च झाला आहे
हळूहळू सर्व राज्यांमध्ये समान नागरी कायदा लागू करतील. शिवाय त्यांना करावाच लागेल”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. सध्या प्रत्येक धर्मासाठी विवाह, संपत्ती याबाबत स्वतंत्र कायदा. सर्व धर्मांना विवाह, घटस्फोट, मालमत्ता, दत्तक यासाठी एकच कायदा लागू होईल. आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही.
'महाराष्ट्राचे हक्काचे पाणी अवैधपणे गुजरातला, आमदारांना या कराराची माहिती नाही'
महाराष्ट्रही योग्यवेळी हा कायदा लागू करण्याबाबत विचार करेल. संविधानाने याबाबत आपल्यावर जबाबतदारी टाकलीय की आपण राज्यात समान नागरी कायदा आणावा”, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं. यामुळे निवडणुकीपूर्वी हा कायदा लागू होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या;
पीक विमा योजनेचे काम बघणाऱ्या कंपनीची कार्यालये बंद, शेतकऱ्यांची मोठी फसवणूक
'महाराष्ट्राचे हक्काचे पाणी अवैधपणे गुजरातला, आमदारांना या कराराची माहिती नाही'
चांगल्या कामाची चुकीची पावती! तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली
Published on: 01 December 2022, 10:16 IST