सध्या हवामान विभागाने अवकाळी पावसाचा इशारा दिला असून निसर्गातील बदलामुळे कोकणातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांवर अस्मानी संकट आलं आहे. निसर्ग, तौक्ते चक्रीवादळ, कोविड, अवकाळी पावसाने आंबा बागायतदार उध्वस्त झाले आहेत, यामुळे आंबा उत्पादनाला फटका बसला आहे. मे महिन्यात आंब्याची आवक वाढण्याची शक्यता होती, परंतु यंदाच्या हंगामात १० टक्केच उत्पन्न राहील अशी शक्यता आहे.
सध्या औषधे व खतांची किंमत वाढली असून उत्त्पन कमी झाले तर हापूस आंब्याचे भाव सामान्यांना परवडणारे नसतील. हंगामाच्या सुरवातीपासूनच अवकाळी पावसाला सुरवात झाली होती. त्यामुळे उत्पन्न ४० टक्के निघेल असा अंदाज होता. परंतु थंड व उष्ण वातावरणाचा परिणाम तसेच पुन्हा अवकाळीचा व हवामान बदलाचा फटका आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे.
आंबा पिकाचे घटते उत्पादन चिंताजनक असून आंब्याच्या असंख्य प्रजाती नष्ट होऊ शकतात त्यांना टिकवण्याचे मोठे आव्हान आहे. सरकारकडून अजूनही आंबा उत्पादकांना कोणतीही मदत मिळालेली नसून सरकारने पुनर्गठनाचे आश्वासन दिले होते पण त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांकडून बँकांनी १४ टक्के व्याजदरानेच वसुली केली.आंबा निर्यातीमध्ये भारत व महाराष्ट्र आघाडीवर असतो, महाराष्ट्रात आंब्याचे क्षेत्र ३,५७,२ ९ ० हेक्टर आहे. मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील कोकण विभागातील हापूस आंबा निर्यात केला जातो त्यापासून शेतकऱ्यांना चांगल्याप्रकारे पैसे मिळतो. परंतु मागील काही वर्षांपासून हवामान बदलामुळे आंबा उत्पादनावर परिणाम होत असून यावेळी परिस्थिती अधिकच भयानक आहे. वातावरणामुळे उत्त्पन्न घटलेले असून कीड व रोगराईचा बंदोबस्त करणारी औषधेही महागली आहेत, यामुळेही उत्पादनावर परिणाम झाला आहे.
आंबा निर्यातीमध्ये भारत व महाराष्ट्र आघाडीवर असतो, महाराष्ट्रात आंब्याचे क्षेत्र ३,५७,२ ९ ० हेक्टर आहे. मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील कोकण विभागातील हापूस आंबा निर्यात केला जातो त्यापासून शेतकऱ्यांना चांगल्याप्रकारे पैसे मिळतो. परंतु मागील काही वर्षांपासून हवामान बदलामुळे आंबा उत्पादनावर परिणाम होत असून यावेळी परिस्थिती अधिकच भयानक आहे. वातावरणामुळे उत्त्पन्न घटलेले असून कीड व रोगराईचा बंदोबस्त करणारी औषधेही महागली आहेत, यामुळेही उत्पादनावर परिणाम झाला आहे.
बदलत्या हवामानाचा परिणाम आंबा उत्पादनावर होत असल्याने केंद्र व राज्य सरकारने योग्य ती पावले उचलून शेतकरी व बागायतदार यांना भक्कमपणे उभे राहण्यासाठी आर्थिक भरिव मदत व सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त शेतकऱ्यानांकडून केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या;
ऊस तुटला आता खोडवा ठेवायचा आहे! तर खोडवा उसापासून अधिक उत्पादन मिळवायचे असेल तर वापरा या टिप्स मिळेल अधिक उत्पादन
आता तरी सरकारला जाग येणार का? वीज भारनियमनाने घेतला शेतकऱ्याचा बळी
शेतकऱ्यांनो काळजी घ्या! रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने लावली हजेरी! याठिकाणी पुन्हा पावसाची शक्यता
Published on: 23 April 2022, 03:24 IST