News

रावेत येथील दिपक मधुकर भोंडवे युवा मंचच्या वतीने नोकरी महोत्सवाचे आयोजन केले आहे,

Updated on 11 March, 2022 10:25 AM IST

रावेत येथील दिपक मधुकर भोंडवे युवा मंचच्या वतीने नोकरी महोत्सवाचे आयोजन केले आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते दिपक मधुकर भोंडवे यांनी माहीती देताना दिली. 

कोरोनाच्या काळा मध्ये अनेक युवक युवतीयांचे नोकरी गेल्याने अनेक शिक्षित युवा तरूण तरूणीचे नोकरी गेले अनेक लोक बेरोजगार होऊन कर्ज बाजारी झाले आता प्रभागातील तरूण तरूणी असतील या सर्वाच्या हाताला काम हवे तर सर्वानी पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील बेरोजगार तरुण-तरुणींना २५ ते ३० नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध करण्यात येत आहे. 

देहूरोड-कात्रज हायवेवरील रावेतच्या समीर लाॅन्समध्ये रविवार दि.१३ मार्च रोजी सकाळी १० ते सांयकाळी ५ वाजेपर्यंत नोकरी महोत्सव घेण्यात येणार आहे. या महोत्सवात २५ ते ३० नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करण्यात आली आहे. या मध्ये मॅन्युफॅक्चरिंग, फायन्सान्स, रिटेल, सेल्स मार्केटिंग, बॅंकिंग, इन्शुरन्स, हाॅस्पिटॅलिटी, फॅसिलिटी, टेलिकाॅम व इतर आय.टी., बी.पी.ओ., के.पी.ओ., फार्मा अशा क्षेत्रात युवक-युवतींना संधी मिळेल. 

याकरिता युवक-युवतींनी स्वताःचा बायोडाटा, सर्व शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट साईट फोटो, आधार कार्ड, मतदान कार्ड इत्यादी प्रत्येकी पाच प्रती सोबत आणावीत, 

तसेच आठवी ते दहावी, बारावी, बी.ए., एम.ए., एम.काॅम., बी.एस.सी., एम.एस.सी., बी.सी.ए., एम.सी.ए., बी.बी.ए., एम.बी.ए., आय.टी.आय., बी.ई., अशा ऑल फॅकल्टीतील डिप्लोमा, सिव्हिल, पदवीधर व पदव्युत्तर या सर्वांनी नोकरी महोत्सवाचा आवश्यक लाभ घ्यावा, असेही आवाहन भोंडवे यांनी केले आहे. तसेच उत्तम सरावासाठी योग्य मार्गदर्शन व दहावी बारावीच्या सर्व माध्यमांच्या विध्यार्था करीता मोफत सराव प्रश्न संच वाटप २०२१-२२ बोर्ड परीक्षे करीता दहावी व बारावी च्या प्रभाग क्रमांक २४ मधील विध्यार्थी साठी असणार आहे . शिक्षकांशी थेट व्यक्तिगत संवाद साधण्यासाठी विनामूल्य हेल्पलाईन सेवा व बोर्ड अनुभवी शिक्षकांच्या मार्गदर्शन साठी वेबिनार मध्ये विनामूल्य प्रवेश असणार आहे.

डॉ अरुणा निकम यांच्या वतीने अक्युप्रेशर थेरपी व माहिती व प्रशिक्षण ही देण्यात येणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते दिपक मधुकर भोडवे यांनी असे अधिक माहिती दिली. 

देहूरोड-कात्रज हायवेवरील रावेतच्या समीर लाॅन्समध्ये रविवार दि.१३ मार्च रोजी सकाळी १० ते सांयकाळी ५ वाजेपर्यंत नोकरी महोत्सव घेण्यात येणार आहे. या महोत्सवात २५ ते ३० नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करण्यात आली आहे. या मध्ये मॅन्युफॅक्चरिंग, फायन्सान्स, रिटेल, सेल्स मार्केटिंग, बॅंकिंग, इन्शुरन्स, हाॅस्पिटॅलिटी, फॅसिलिटी, टेलिकाॅम व इतर आय.टी., बी.पी.ओ., के.पी.ओ., फार्मा अशा क्षेत्रात युवक-युवतींना संधी मिळेल. 

English Summary: Unemployed youth will get job opportunities
Published on: 11 March 2022, 10:25 IST