1. बातम्या

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत जनधन खात्यातील महिला खातेधारकांना प्रत्येकी 500 रुपये

KJ Staff
KJ Staff


मुंबई:
कोविड-19 मुळे देशभरात लागू असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय वित्तमंत्रालयाच्या व्ययविभागाअंतर्गत असलेल्या महालेखा नियंत्रक कार्यालयाने सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन व्यवस्थेचा वापर करत, थेट लाभ हस्तांतरण योजनेमार्फत 16.01 कोटी लाभार्थ्यांच्या खात्यात 36,659 कोटी रुपये जमा केले आहेत.

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत घोषित करण्यात आलेल्या रोख रकमेचेही DBT मार्फत थेट लाभार्थ्यांच्या खात्यात डिजिटल पेमेंट करण्यात आले. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गतजनधन खात्यातील महिला खातेधारकांच्या खात्यात प्रत्येकी 500 रुपये जमा करण्यात येत आहे. 13 एप्रिल 2020 पर्यंत अशा महिला लाभार्थ्यांची संख्या 19.86 कोटी होतीत्यांच्या खात्यात एकूण 9,930 कोटी रुपये जमा करण्यात आले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेरपे गावातील जनतेलाही केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळत आहे. प्रधानमंत्री अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत इथल्या गरीब कुटुंबांना प्रति व्यक्ती किलो धान्य मिळत आहे. जनधन योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात 500 रुपयांची मदतही जमा होत आहे. याशिवाय प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत गावातील सुमारे 100 महिलांच्या खात्यात गॅसची सबसिडी जमा करण्यात आली आहे. लॉक डाऊनच्या काळात ही सबसिडी जमा झाल्यामुळे गावातील जनतेला मोठा दिलासा मिळाल्याची भावना गावाच्या सरपंच निशा गुरव यांनी व्यक्त केली आहे.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters