News

शेतातील वाद हे अनेकांच्या जीवावर उठतात हे आपण अनेकदा बघितले आहे. अनेक कारणांमुळे शेतात वाद होत असतात. यामुळे घराघरात भांडण होतात. पुरंदर तालुक्यातील वागदरवाडी येथे असेच काहीसे घडले आहे.

Updated on 09 January, 2023 10:23 AM IST

शेतातील वाद हे अनेकांच्या जीवावर उठतात हे आपण अनेकदा बघितले आहे. अनेक कारणांमुळे शेतात वाद होत असतात. यामुळे घराघरात भांडण होतात. पुरंदर तालुक्यातील वागदरवाडी येथे असेच काहीसे घडले आहे.

वागदरवाडी येथील काका पुतण्याचे जमिनीवरून वाद आहे. पुतण्या जमिनीत आल्याचे पाहून काकाने चक्क रॉकेल ओतून पुतण्याला पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

याचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. या प्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. भास्कर त्र्यंबक भुजबळ यांनी जमिनीच्या वादातून पुतण्यला रॉकेल टाकून पेटवण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी शारदा भुजबळ यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.

माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत राज्य सरकार मुलींना देणार 50 हजार रुपये

याबाबत माहिती अशी की, शारदा भुजबळ यांच्या शेतात भास्कर भुजबळ यांनी न विचारता उसाचे पीक घेऊन उस तोड सुरू केली होती. या ऊस तोडणीचे काम थांबविण्याकरता फिर्यादी आणि मुलगा स्वप्नील असे गेले होते.

यावेळी भास्कर भुजबळ यांनी स्वप्निलच्या अंगावर रॉकेल टाकून पेटविण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला भास्कर यांनी स्वप्नीलच्या अंगावर रॉकेल ओतले. यानंतर त्याला पेटवण्याचा देखील प्रयत्न केला. यावेळी काही लोकांनी अडवण्याचा प्रयत्न केल्याने मोठी घटना टळली.

95 हजार एकराची शेती त्याला बांधच नाही, 12 किलोमीटर शेताला बांधच नाही, तेही आपल्या महाराष्ट्रात..

या घटनेचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे. हातामध्ये पेटता टेंभा घेऊन काका आपल्याच पुतण्याच्या अंगावर धावत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यामुळे या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या;
जमिनीची सुपीकता कशी वाढवायची, जाणून घ्या संपूर्ण पद्धत
महिंद्रा XUV400 इलेक्ट्रिकची कमाल! 751 किलोमीटरच्या रेंजसह अनेक फीचर्स..
द्राक्षांना मिळतोय विक्रमी दर, काळी द्राक्ष 130 तर साधी द्राक्ष 70 ते 80 किलो

English Summary: uncle open air, kerosene nephew took Tembha hands ran kill agriculture
Published on: 09 January 2023, 10:23 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)