सर्वात मोठे धरण म्हणून ओळख असलेले उजणीचे धरण अजूनही 100 टक्केच आहे. उजनी धरणाची साठवण क्षमता १२३ टीएमसीपर्यंत असून पावसाळा संपला, त्यावेळी धरण हाऊसफुल्ल होते. आता पावसाळा संपून अडीच महिने होऊनही उजनीत १००.४५ टक्के पाणीसाठा आहे. याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
धरणाच्या पाण्यावर ४० हून अधिक साखर कारखाने, १४ औद्योगिक वसाहती, शेती व शेतीपुरक व्यवसाय, गोड्या पाण्यातील मासेमारी, असे व्यवसाय अवलंबून आहे. यामुळे या पाण्यावर अनेकांचे उदरनिर्वाह चालतात.
यामुळे दरवर्षी हजारो कोटींची उलाढाल होते. धरणातून सीमा-माढा, दहिगाव या योजनांमधून शेतीला पाणी दिले जाते. कॅनॉल व बोगद्यातूनही शेतीला पाणी मिळते. याचा शेतकऱ्यांना फायदा होतो.
उन्हाळी खरबूज लागवडीचे तंत्र काय आहे? जाणून घ्या..
तसेच भीमा नदीतून सोलापूर शहराला पाणी सोडले जाते. आता धरणातून १७ जानेवारीपासून शेतीसाठी पाणी सोडले जाणार आहे. पावसाळा संपून अडीच महिने होऊनही धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याने यंदा उन्हाळ्यात धरण मायनसमध्ये जाणार नाही.
तसेच सोलापूर शहरातील नागरिकांसाठी २० ते २५ जानेवारी दरम्यान भीमा नदीतून औज बंधाऱ्यात पाणी सोडले जाणार आहे. अजूनही धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याने यंदा उन्हाळ्यात धरण मायनसमध्ये जाणार नाही.
महत्वाच्या बातम्या;
ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी सरकार देणार पैसे, मजूर टंचाई आणि फसवणुकीवर निघणार तोडगा..
आगामी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मिळणार भेट, PM किसान सन्मान निधीची रक्कम वाढण्याची शक्यता...
शेतकऱ्यांनो म्हशींच्या या जाती आहेत दुधासाठी फायदेशीर, जाणून घ्या..
Published on: 16 January 2023, 04:43 IST