पुणे : सोलापूर आणि लगतच्या जिल्ह्यांचे आशास्थान असलेले उजनी धरण १००% भरण्याचा मार्गावर आहे. पश्चिम घाट परिसरात चांगला पाऊस झाल्यामुळे घाटातील धरणे भरली आहेत. त्यामुळे उजनीच्या क्षेत्रात अव्याहतपणे पाणी येत असल्याने हे धरण आता ९०% भरले आहे. अजून असाच पाऊस सुरु राहिला तर थोड्या दिवसात हे धरण १००% भरेल अशी शक्यता निर्माण झाली आहे.
उजनी हे धरण सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान आहे. उजनीत पाणी असेल तर सोलापूर जिल्हा सुजलाम सुफलाम आहे असे म्हटलं जात. यावर्षी सुरुवातीला सलामी देऊन नंतर मात्र पशु पश्चिम घाटातून गायब झाला होता. जवळपस संपूर्ण जुलै महिना कोरडा गेला. त्यामुळे पुणे आणि शेजारच्या जिल्ह्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. परंतु ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झाला. त्यामुळे उजनी धरणाला पाणी पुरवठा करणारी धरणे भरली.
मागच्या वर्षी याच दिवसात उजनी धरण १००% पेक्षा अधिक भरले होते. यावर्षीची पाण्याचा विसर्ग असाच राहिला तर पुढच्या एक ते दोन आठवड्यात धरण भरू शकते.
Published on: 28 August 2020, 03:15 IST