News

Shivsena: शिवसेनेतील फुटीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) शनिवारी रात्री उशिरा धनुष्य-बाण (bow and arrow) हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय दिला आहे. त्याचबरोबर शिवसेना हे नाव वापरण्यासही दोन्ही गटाला मनाई करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

Updated on 09 October, 2022 9:53 AM IST

Shivsena: शिवसेनेतील फुटीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) शनिवारी रात्री उशिरा धनुष्य-बाण (bow and arrow) हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय दिला आहे. त्याचबरोबर शिवसेना हे नाव वापरण्यासही दोन्ही गटाला मनाई करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियातून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा फोटो शेअर करत जिंकून दाखवणारच असे म्हटले आहे. इन्स्टाग्रामवर केलेल्या या पोस्टला शिवसैनिकांनी जोरदार प्रतिसाद दिला आहे.

पुढील संघर्षासाठी आम्ही तयार असल्याचे शिवसैनिकांनी म्हटले आहे. शिवसेना ही संघर्षातून तयार झाली असून आतदेखील संघर्षातून ती पुढे जाणार असल्याचे शिवसैनिकांनी म्हटले.

मोठी बातमी: शिवसेनेचे निवडणूक चिन्ह ‘धनुष्यबाण’ निवडणूक आयोगाने गोठवलं

निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर राज्याच्या राजकारणातून प्रतिक्रियांना वेग आला आहे. शिवसैनिक, पक्षाचे कार्यकर्ते यांनी आपण लढू. या लढाईत आम्ही पक्षासोबत आहोत असंही म्हंटलं आहे. आमचे चिन्ह उद्धव बाळासाहेब ठाकरे असे म्हणत शिवसैनिकांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत.

दुर्दैवी! विद्युत तारेचा करंट तळ्यात उतरला; एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा मृत्यू

ऐकावे ते नवलंच! चक्क विहीर चोरीला गेली! काय आहे अजब गजब प्रकार जाणून घ्या..

English Summary: Uddhav Thackeray's reaction after Election Commission freezes symbols
Published on: 09 October 2022, 09:53 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)