मुंबई
सध्या राज्यात पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनादरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगले घमासान रंगले आहे. याचदररम्यान माजी मुख्ममंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे सर्वांच्या राजकीय भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रवादीतील बंडानंतर उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांची ही पहिलीच भेट आहे.
उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरेही यावेळी उपस्थित होते. ठाकरेंनी अजित पवार यांना भला मोठा पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. तर अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांना स्वत: बसायला खुर्ची दिली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चाही झाली. भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी ते म्हणाले की, अजित पवार यांना भेटलो. चांगलं काम करा म्हणालो. मूळ विषयाकडे दुर्लक्ष करू नका असं अजित पवार यांना बोललो. राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आता त्यांच्याकडे आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले. 5 मिनिटं दोन्ही नेत्यांत चर्चा झाली. शरद पवारांच्या भूमिकेवर दोन्ही नेत्यांत चर्चा झाल्याची माहीती सूत्रांनी दिली.
Published on: 19 July 2023, 05:38 IST