एक निर्यण जो तुमचं आयुष्य बदलून टाकेल, अशी वाक्य आपण नेहमी जाहिरातीमध्ये किंवा एखाद्या वक्तांच्या तोंडून नेहमी ऐकत असाल. अशाच निर्णय घेत महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड गावात राहणाऱ्या दोन युवकांनी घेतला आणि त्यांनी आपला वेगळा मार्ग शोधला. ग्रामीण भागातील या दोन हुन्नरी युवकांनी डिजिटल क्षेत्रात पाऊल ठेवत शेतकऱ्यांच्या आणि ग्राहकांच्या उपयोगी येईल, असं 'एग्रो डिल्स' एप्प तयार केलं.
सध्या देशात लॉकडाऊन चालू असल्याने शेतकरी आपला शेतमाल, भाजीपाला, यांची विक्री करण्यासाठी बाजारपेठेत जाऊ शकत नाही. वाहतूक कमी चालू असल्याने बऱ्याच शेतकऱ्यांना आपला शेतमाल हा बाजारात न नेता शेतातच सडू द्यावा लागत आहे. अशीच परिस्थीत ग्राहकांची आहे, त्यांना योग्य भाजीपाला, फळे मिळत नाहीत. यामुळे काही किरकोळ विक्रेत्यांकडून ग्राहकांची लूट केली जात आहे. पण आता एग्रो डिल्स या एप्पमुळे शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना दोघां फायदा होणार आहे. शुभम वाघ आणि शंकर जाधव या दोन तरुणांच्या कल्पनेतून साकारलेले एग्रो डिल्स एप्प हे शेतकऱ्यांसाठी चांगला पर्याय म्हणून समोर येत आहे.
दोन्ही तरुणही उच्चशिक्षित आहेत. शुभम वाघ हा बी.कॉम करुन आपल्या DTL (Diploma in Taxation Law) चं शिक्षण घेत आहे. तर शंकर जाधव याने बीएससीचे शिक्षण पुर्ण केले आहे. हे एप्प तयार करण्यामागे मागे शुभम वाघ यांनी एक रोचक कथा सांगितली, 'मी शेतकरी कुटुंबातील आहे, माझ्या वडिलांना गाय घ्यायची होती. पण कुठे चांगल्या प्रतीची गाय मिळेल याची माहिती नव्हती. चांगल्या प्रतीच्या गायीसाठी बऱ्याच ठिकाणी गेले, त्यात त्यांचा पैसा खर्च झाला, यातून मला कल्पना सुचली की, शेतकऱ्यांना किंवा पशुपालकांना खरेदी - विक्रीविषयी माहिती देणारे एप्प असावं', असे शुभमने सांगितले.
एग्रो डिल्स या एप्पच्या माध्यमातून आपण भाजीपाला, फळे, खरेदी करु शकता. आपल्याला पशुपालनाची आवड आहे, पण चांगल्या जातीची किंवा दूध अधिक देणारी गाय, म्हैस कुठे मिळेल याची माहिती नसते. अशी समस्याही हे एप्प सोडवणार आहे. आपल्या जवळच्या परिसरात कुठे पशुविक्रीसाठी आहे, याची सर्व माहिती आपल्याला या एप्पमुळे मिळणार आहे. विशेष म्हणजे या व्यवहारात कुठेच एंजटचा संबंध नसणार आहे. यामुळे पशु घेणाऱ्या ग्राहकांला अधिक पैसा खर्च करण्य़ाची गरज नाही य़ाशिवाय जनावरांच्या जातीविषयी आपण निश्चित असतो. विक्री करणाऱ्यांशी आपण संपर्क साधत असल्याने यात फसवणूक होण्याची शक्यता नाही. जनावरांमध्ये आपण शेळी, मेंढी, गाय, बैल, म्हैस सर्व गुरांच्या खरेदी- विक्रीविषयी माहिती आपल्याला यात मिळणार आहे.
पशुपालन करताना आपल्याला पशुंची काळजी घ्यावी लागते. जर तुम्ही दुधाचा व्यवसाय करायचा असेल तर काळजी अधिक घ्यावी लागते. जनावरांना होणाऱ्या आजारांविषयी माहिती असणे आवश्यक असते. वेळेवर डॉक्टर भेटला पाहिजे जेणेकरून आपण आपल्या गुरांची काळजी घेऊ शकाल. एग्रो डिल्स या एप्पमध्ये तुम्हाला पशुवैद्यकीय सेवेचाही लाभ मिळणार. आपल्या परिसरातील डॉक्टरांचा नंबर आणि त्यांची माहिती आपल्याला या एप्पद्वारे मिळणार आहे. तुम्हाला फक्त आपला पत्ता त्यात टाकयचा आहे, त्यानंतर हे एप्प तुम्हाला नोंदणी केलेल्या सर्व डॉक्टारांची माहिती देईल.
या एप्पच्या माध्यमातून दररोज २०० ते ३०० शेतकरी आपल्या शेतमालाची माहिती यात टाकून आपला शेतमाल विकत आहेत. शेतमाल, पशुंच्या विक्री - खरेदी सह आपण आपल्या नर्सरीची जाहिरात यात एप्पच्या साहाय्याने करु शकता. जर शेतकरी आहात तर आपला शेतमालासाठी या एप्पच्या साहाय्याने ग्राहक शोधू शकता. यासह या एप्पमध्ये पशुवैद्यकीय सेवेचाही लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे. आतापर्यंत एग्रो डिल्स हे एप्प ४ हजार लोकांनी डाऊनलोड केले. आपल्या पुढील वाटचालीविषयी बोलताना शुभम वाघ म्हणाला की, भविष्यात शेतकऱ्याकडील माल आम्ही दुसरीकडे एक्सपोर्ट करणार आहोत.
हे एप्प आपल्याला प्ले स्टोअरमध्ये एग्रो डिल्स असे नावाचे एप्प आहे. शेतकरी, ग्राहक , डॉक्टर हे पण या एप्पचा फायदा घेऊ शकता. पशुवैद्य असाल तर आपण त्यात त्याप्रकारचे नमुद करावे. डाऊनलोड झाल्यानंतर त्यात दोन पर्याय आहेत शेतकरी आणि डॉक्टर योग्य त्यावर क्लिक करु आपण आपली पुर्ण माहिती नावासह भरावी.
एग्रो डील्स भाजीपाला खरेदी करण्याचा मार्ग
अशी करा ऑर्डर
जिल्हा व तालुका निवडा
फळे आणि भाज्या निवडा
शेतकरी संपर्क क्रमांक मिळवा
शेतकरीला ऑर्डर द्या.
Published on: 06 May 2020, 12:46 IST