राज्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून ठिबक तुषार सिंचन करिता अनुदान देण्यात येते. या अनुदानासाठी राज्य शासनाकडून 200 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यासंबंधीचा शासनादेश 6 जानेवारी 2022 रोजी जारी करण्यात आल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिली.
या योजनेअंतर्गत अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना खर्च मर्यादेच्या 55 टक्के व इतर शेतकऱ्यांना खर्च मर्यादेच्या 45 टक्के अनुदान हे पाचहेक्टर कमाल क्षेत्राकरिता देण्यात येते. या योजनेकरिता केंद्रशासन 60 टक्के व राज्य शासन 40 टक्के या प्रमाणात निधी उपलब्ध करून देते.राज्य शासनाने शेतकऱ्यांनाप्रधानमंत्री सुक्ष्म सिंचन योजना अंतर्गत अनुदान देण्याचा निर्णय 18 नोव्हेंबर 2021 रोजी घेतला होता.
त्यानुसार अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना पंचावन्न टक्के अनुदान व्यतिरिक्त 25 टक्के पूरक अनुदान तर इतर शेतकऱ्यांना मिळणाऱ्या 25 टक्के अनुदान व्यतिरिक्त 30 टक्के पूरक अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आह. यानुसार या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना 75 ते 80 टक्के अनुदान मिळणार आहे.
सूक्ष्म सिंचन संच बसवणारे शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावी याकरता पूरक अनुदान देण्यासाठी लागणारा जो आर्थिक भारसरकार उचलणार आहे. या निधीच्या माध्यमातून वर्ष 2021 ते 22 या वर्षामध्ये सूक्ष्म सिंचन संच बसवलेल्या शेतकऱ्यांना पूरक अनुदानाचे वितरण करण्यात येणार आहे..
Published on: 08 January 2022, 09:39 IST