इंदापूर तालुक्यातील वरकुटे बु. येथील दोन शेतकऱ्यांनी चक्क भुईमुगाच्या आणि लसूण पिकामध्ये अफूची लागवड केल्याचे आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी टाकलेल्या धाडीत दोन शेतकऱ्यांना अटक करण्यात आली आहे.
या धाडीमध्ये पोलिसांनी 1135 अफूचीझाडे आणि 32 किलो अफूची बोंडे जप्त केले आहेत. दोन फेब्रुवारी रोजी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी पांडुरंग नामदेव कुंभार व नवनाथ गणपत शिंदे या दोन शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाची फिर्यादसुरेंद्र जयवंत वाघ यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात दिली होती.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांडुरंग नामदेव कुंभार यांचा गट नंबर 24 व नवनाथ गणपत शिंदे यांच्या भुईमूग आणि लसणाच्या पिकांमध्ये चक्क आंतरपीक म्हणून अफुया अमली पदार्थाच्या झाडांची बेकायदेशीर त्या लागवड केलेली पोलिसांना आढळले.पोलिसांनी बुधवारी सायंकाळी टाकलेल्या धाडीत भुईमूग आणि लसूण यांच्या शेतात अफूची लागवड केलेली दिसून आली. यामध्ये 1135 झाडे अफूची लावलेली होती व त्यांना जवळजवळ 32 किलो वजनाची बोंडे होती.
हे सगळे पोलिसांनी जप्त केले. जर या मालाची बाजारपेठेतील किमतीचा विचार केला तर ती दोन लाख तीस हजार पाचशे पन्नास रुपये आहे. याप्रकरणी पोलिसांनी अमलीपदार्थ औषधी द्रव्य व मनप्रभावी पदार्थ कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
Published on: 04 March 2022, 09:36 IST