गेल्या खरीप हंगामपासून राज्य सरकारने ‘ई-पीक पाहणी’ सुरु केली. खरीप हंगामात ‘ई-पीक पाहणी’ला चांगला प्रतिसाथ मिळाला. सध्या रब्बी हंगाम अंतिम टप्प्यात आहे. मात्र, रब्बी हंगामात या उपक्रमाकडे शेतकऱ्यांनी पूर्णपणे पाठ फिरवली आहे. सरकारने ‘ई-पीक पाहणी’ साठी दोन वेळा मुदतवाढ दिली. शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीच्या माध्यमातून पिकांच्या नोंदी करण्याकडे दुर्लक्ष केले आहे.
गेल्या खरीप हंगामापासून महसूल कर्मचारी तलाठी यांची भूमिका शेतकरीच बजावत आहे. ई-पीक पाहणी’ साठी दोन वेळा मुदतवाढ दिली. आता 28 फेब्रुवारी ही अंतिम मुदत आहे. या दोन दिवसात पीक पाहणी होणार आहे का? हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे. रब्बी हंगामात ई-पीक पाहणी झाली नाही. यामुळे आता पिकांचे नुकसान झाले तर आला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
हेही वाचा: मोठी बातमी: साखर कारखाने विकण्याऐवजी भाडेतत्त्वावर देणार
रब्बी हंगामातील पिकांची नोंद करण्यासाठी 15 फेब्रुवारीपर्यंतची मुदत देण्यात आली होती. पण यामध्ये शेतकऱ्यांचा अत्यल्प सहभाग पाहून 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढविण्यात आली होती. गेली दोन महिने कृषी विभागाकडडून जनजागृती केली नाही तर आता अंतिम टप्प्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन केले जात आहे. त्यामुळे दोन महिन्यात झाले नाही ते दोन दिवसांमध्ये होईल का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
Published on: 26 February 2022, 02:46 IST