जर आपल्या मनामध्ये काही व्यवसाय करायचा विचार येत असेल आणि कमीत कमी वेळात जास्त पैसा कमावण्याची इच्छा असेल तर हा काळ फारच योग्य आहे. कारण आता सणासुदीचा काळ सुरू होत आहे, या महिन्यांमध्ये वेगवेगळ्या धर्मांच्या आणि पंथांच्या अनेक प्रकारचे सण येणार आहेत. अशा परिस्थितीत जर आपल्याला व्यवसाय सुरू करायचा असेल तर तो आता सुरू केला तर फारच फायदेशीर राहिल. काही दिवसांमध्ये दिवाळीचा सण येऊ घातलाय. जर तुम्हाला या दिवाळीच्या सणामध्ये कमी वेळात जास्त पैसा कमवायचा असेल तर तुम्हाला काही दिवाळीच्या बिझनेस आयडिया या लेखात देत आहोत.
फटाक्यांचा विक्री व्यवसाय
दिवाळीतील व्यवसायाची चर्चा करत असताना, आपण या दिवाळीमध्ये फटाके विकून लाखो रुपये कमवू शकता. भलेही दिल्ली सुप्रीम कोर्टाने फटाके विक्रीवर प्रतिबंध लावले आहेत. तरीही काही राज्यांमध्ये फटाके खरेदी करणे आणि विक्री करणे यांना मान्यता आहे. यामुळे आपल्याला फटाके विक्रीतून चांगला नफा मिळवता येऊ शकतो. जर आपण १०० किलो किंवा ६०० किलो पर्यंत स्पार्कल बरोबर आवाज करणारे फटाके विक्री करता तर आपल्याला राज्य पोलिसांची टेम्पररी लायसन्स घ्यावी लागते. या लायसन्सला डिस्ट्रिक्ट डेप्युटी कलेक्टर जारी करतात.
डेकोरेशन लाईटचा व्यवसाय
दिवाळीच्या सणामध्ये सजावटीसाठी बऱ्याच गोष्टींची आवश्यकता असते. या सजावटीच्या वस्तू विक्री करून आपण चांगला नफा मिळू शकतो. आपण या व्यवसायाला १० हजार रुपयांचे भांडवल गुंतवून सहजतेने हा व्यवसाय सुरू करू शकतो. आपण सजावटीसाठी लागणारे सगळे वस्तू होलसेल मार्केटमधून खरेदी करू शकतात. यामध्ये रिटेलर विक्रेत्यांसाठी २५ ते ३० टक्क्यांपर्यंत मार्जिन मिळतो. होलसेल मार्केटमध्ये एका प्रकारचे लाइटिंगचे कमीत-कमी १० पीस मिळतात. हा व्यवसाय आपल्याला दिवाळीमध्ये चांगले उत्पन्न मिळवून देऊ शकतो.
Published on: 21 October 2020, 06:04 IST