महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांच्या विक्री व्यवहारात पंचवीस हजार कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करून या भ्रष्टाचाराची चौकशी केंद्रीय सहकार मंत्रालयने सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधिशां मार्फत करावी अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे.
केंद्रिय सहकार मंत्री अमित शहा यांना हजारे यांनी यासंबंधी पत्र पाठवले आहे. शेतकऱ्यांनी आपले भागभांडवल व जमिनी देऊन उभे केलेले साखरकारखाने महाराष्ट्रातील प्रमुख पदांवरील निवडक राजकारणी व अधिकारी यांनी कवडीमोल भावाने संगनमताने विकत घेतले आहेत. या मधून अंदाजे 25 हजार कोटींचा घोटाळा झाला आहे.
तसेच नवीन सहकारी साखर कारखान्यांच्या स्थापनेसाठी इरादा पत्र केंद्र सरकारच्या अखत्यारीतील विभागातर्फे दिले जात असल्याचे त्यांनी म्हटले.
कसा झाला हा घोटाळा?
साखर कारखान्यांचे पुनरुज्जीवन व्हावे यासाठीचा आर्थिक मागणी करणारा एकही प्रस्ताव राज्य सरकारने पाठवलेला नाही. याचे कारण चुकीचे व्यवस्थापन हेच होते.
हे अनवधानाने झाले नव्हते, तर पूर्वनियोजित आणि नियोजनबद्ध होतेकारण राज्य सरकार मधील लोक, आर्थिक संस्थांमधील प्रमुख लोकआणी साखर कारखान्यांच्या संचालक मंडळावरील लोक या सर्वांचे संगनमत होते, असा दावा अण्णांनी पत्रामध्ये केला आहे.
Published on: 25 January 2022, 05:25 IST