ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 24 जुलै 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.
नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) नवीन संधी लवकरच दार ठोठावणार आहेत. त्यामुळे त्या दृष्टीने विचारसरणी बदलण्याचा प्रयत्न करा. आज आर्थिक व्यवहार पूर्ण होणं कठीण जाईल. व्यावहारिक विचार करा आणि भागीदारी करणं टाळा.
शुभ रंग : Yellow and Blue शुभ दिवस : रविवार शुभ अंक : 9 दान : कृपया मंदिरात कुंकू दान करा.
नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं) आज अगदी समाधानाचा आणि ऐशोआरामाचा दिवस आहे. गृहिणींनी आपल्या घरी छोटेसं गॅदरिंग आयोजित केल्यास उत्तम. पार्टनरशिपमध्ये असलेल्या फर्म इतरांपेक्षा चांगला व्यवसाय करतील.
बिझनेस कमिटमेंट पूर्ण होण्यास काहीसा उशीर होईल; मात्र कामं पूर्ण होतील. एखाद्या मोठ्या कंपनीसोबत पार्टनरशिप करण्यासाठी चांगली वेळ आहे. कृपया प्रवास टाळा. वितरक, राजकारणी, वकील, रिटेलर, शिक्षणतज्ज्ञ, डॉक्टर आणि ज्वेलर या व्यक्तींनी आज कागदपत्रांवर सही करताना खबरदारी घ्यावी.
शुभ रंग : Sky Blue शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 2 आणि 6 दान : कृपया मंदिरामध्ये किंवा गरजूंना दही दान करा.
हे ही वाचा
काय सांगता ! कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण; पेट्रोल डिझेल आणखी स्वस्त? वाचा..
नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमची देहबोली आणि संवादकौशल्य याची नेहमीच इतरांवर चांगली छाप पडते. आज तुमच्या वैयक्तिक आयुष्यात एखादी नवी सुरुवात होऊ शकते.
तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे आज जे काही कराल त्यात नशीब तुम्हाला साथ देईल. योग प्रशिक्षक, शिक्षणतज्ज्ञ, मार्केटिंग आणि सेल्स क्षेत्रातल्या व्यक्ती, संगीतकार, डिझायनर, विद्यार्थी, न्यूज अँकर्स, राजकारणी, अभिनेते, कलाकार, गृहिणी, हॉटेल व्यावसायिक आणि लेखकांना आज करिअरमध्ये विशेष फायदा मिळेल. दिवसाची सुरुवात करताना कपाळावर चंदनाचा टिळा लावणं उत्तम.
शुभ रंग : Red and blue शुभ दिवस : गुरुवार शुभ अंक : 3 आणि 1 दान : कृपया मंदिरामध्ये पिवळा भात दान करा.
नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुम्ही व्यवस्था, नियम या गोष्टींना मनापासून मानता. त्यामुळेच तुम्ही एक उत्तम अधिकारी होऊ शकता.
सरकारी किंवा मोठ्या कंपन्यांमध्ये काम करणं तुमच्यासाठी योग्य करिअर चॉइस आहे. आज एखाद्या नवीन संकल्पनेतून किंवा नव्या मार्गाने पैसे कमावता येतील. तुमच्या मित्राने किंवा बॉसने दिलेली एखादी ऑफर नक्की स्वीकारा. धान्य दान केल्यामुळे भरपूर आशीर्वाद मिळतील.
आज तब्येत सांभाळणं गरजेचं आहे. ब्रोकर, बांधकाम, मशिनरी, मेटल, सॉफ्टवेअर आणि फार्मास्युटिकल अशा क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींनी आज करारावर सही करणं टाळावं. तुमच्या व्यावहारिक कौशल्यामुळे तोटा कमी आणि नफा भरपूर होईल. वडिलांना आपल्या मुलांचा अभिमान वाटेल.
शुभ रंग : Blue कृपया मंदिरात दोन नारळ दान करा.
हे ही वाचा
क्या बात है! अपंग पेन्शन योजनेचे ऑनलाइन अर्ज सुरू; इतकी मिळतेय पेन्शन
नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) सकाळच्या वेळी गवतावर अनवाणी चालल्यामुळे आरोग्याला फायदा होईल. आज तुमच्या ओळखींमुळे भरपूर प्रसिद्धी मिळेल. तसंच करिअरमध्येही वृद्धी होईल.
प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्यासंबंधी निर्णय स्वतःच घ्या, इतरांचे सल्ले ऐकत बसल्यास गोंधळ वाढेल. खेळाडू आणि ट्रॅव्हलर असणाऱ्या व्यक्तींना चांगली वेळ येण्यासाठी वाट पाहावी लागेल. मीटिंगमध्ये हिरव्या रंगाचे कपडे घातल्याने फायदा होईल. आज आळशीपणा आणि वर्क फ्रॉम होम करणं टाळा.
शुभ रंग : Green and White, शुभ दिवस : बुधवार, शुभ अंक : 5, दान : कृपया एखाद्या मित्राला किंवा मंदिरात तुळशीचं रोप दान करा.
नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज घरून किंवा ऑनलाइन पद्धतीने काम करणं योग्य ठरेल. करिअरमध्ये मोठं यश मिळण्याची शक्यता आहे. समाजातून, सहकाऱ्यांकडून तुम्हाला भरपूर प्रेम, कौतुक आणि पाठिंबा मिळेल.
खेळाडू, डिफेन्स अधिकारी, सॉफ्टवेअर इंजिनीअर, गृहिणी, शिक्षक, ज्वेलर्स, अभिनेते, जॉकी आणि डॉक्टरांना त्यांची कौशल्यं दाखवण्याची संधी मिळेल. आजचा दिवस या व्यक्तींसाठी भाग्याचा आहे. पालकांना आपल्या मुलांचा अभिमान वाटेल.
शुभ रंग : Blue and Yellow शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : कृपया आश्रमात स्टीलची भांडी दान करा.
नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) योग्य वेळी नमतं घेऊन दुसऱ्यांच्या भावना समजून घेणं गरजेचं आहे हे लक्षात घ्या. इतरांनी दिलेले सल्ले स्वीकारण्याची वेळ आता आली आहे. तुम्हाला कमीत कमी सहकाऱ्यांसोबत काम करणं आवडत असलं, तरी आता तुमची टीम मोठी करण्याची गरज आहे. तुमच्या परफॉर्मन्समुळे बॉसवर चांगली छाप पडेल.
जोडप्यांमध्ये एकमेकांप्रति विश्वास आणि आदर वाढेल. आज कागदपत्रांवर सही करण्यासाठी चांगला दिवस. हीलिंग, मोटिव्हेशन, गूढविद्या, आध्यात्मिक शाळा, शेती, धान्य अशा व्यवसायांमध्ये असणाऱ्यांसाठी भाग्याचा दिवस. बोलण्यात मृदूपणा आणल्यास बिझनेस व्यवहार सुरळीत पार पडतील.
शुभ रंग : Orange and Blue शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 7 दान : कृपया आश्रमांमध्ये पुस्तकं आणि स्टेशनरी साहित्य दान करा.
नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) भटक्या जनावरांची काळजी घेतल्यामुळे तुमच्या स्वभावातलं अॅग्रेशन कमी होते. आज तुमचा ब्रँड जेवढा मोठा असेल, तेवढा जास्त फायदा होईल. नवीन संधी आणि नवीन नातेसंबंध यांकडे नक्की लक्ष द्या.
कामाच्या ठिकाणी एखादी वरिष्ठ व्यक्ती तुमची मार्गदर्शक म्हणून तुमच्या सोबत आहे. त्या व्यक्तीचा सल्ला टाळू नका. बिझनेस व्यवहार यशस्वीपणे पार पडतील. करार किंवा मुलाखती दिरंगाई न करता पूर्ण करा.
आज एखादा कौटुंबिक कार्यक्रम किंवा मित्राच्या पार्टीला हजेरी लावाल. प्रेमसंबंधांमध्ये विश्वास वाढवण्यासाठी आणि सोशल नेटवर्क वाढवण्यासाठी उत्तम दिवस. कृपया मांसाहार आणि मद्यपान टाळा.
शुभ रंग : Sea Blue शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : कृपया गायींना पाणी द्या.
नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) मनगटावर लाल धागा बांधा आणि शक्यतो लाल रंगाचं मोबाइल कव्हर वापरा. यामुळे मंगळ ग्रहाची ऊर्जा मिळेल. तुमच्या सर्व समस्या आता संपत चालल्या आहेत. त्यामुळे दिवस समाधानी राहील.
शुभ रंग : Red शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 आणि 6 दान : कृपया गरिबांना कलिंगड दान करा.
महत्वाच्या बातम्या
irrigation: सरकारची भन्नाट ऑफर; शेतातील सिंचनासाठी विजेची गरज पडणार नाही
शेतकऱ्यांचे सोन्याचे दिवस; पीक नष्ट झालं तरी मिळणार सुरक्षा, सरकार देतंय एवढी रक्कमदिलासादायक बातमी! पीएम किसान योजनेतील शेतकऱ्यांना 21 हजार कोटी रुपयांचे वाटप
Published on: 24 July 2022, 09:39 IST